Home > News > पुढील तीन दिवस तीव्र उष्णतेची लाट, कोणत्या भागांचा समावेश आहे पहा..

पुढील तीन दिवस तीव्र उष्णतेची लाट, कोणत्या भागांचा समावेश आहे पहा..

30 मार्च ते 2 एप्रिल अशा चार दिवसांमध्ये महाराष्ट्रात या जिल्ह्यात उष्णतेची लाट असणार आहे. हवामान खात्याकडून या तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील तीन दिवस तीव्र उष्णतेची लाट, कोणत्या भागांचा समावेश आहे पहा..
X

हवामान बदल, तापमान वाढ हे शब्द मागच्या काही दिवसांपासून आता अनेकांच्या तोंडावर असतील. कारण मागच्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळा लोकांना बसू लागल्या आहेत. उत्तर भारतासह देशातील बहुतांशी राज्यांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मागच्या काही दिवसांमध्ये ढगाळ वातावरण होते मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून उष्णतेने उच्चांक गाठला आहे.

हवामान खात्याने नुकत्याच जाहीर केलेल्या एका रिपोर्ट मध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये वाढणाऱ्या उष्णते बाबत इशारा देण्यात आला आहे. यामध्ये नमूद केल्याप्रमाणे 30 मार्च ते 2 एप्रिल अशा चार दिवसांमध्ये औरंगाबाद, नगर, जालना, जळगाव, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात उष्णतेची लाट असणार आहे.

तर दक्षिण कोकण, उत्तर कोकण व दक्षिण मध्य महाराष्ट्रात वातावरणात फारसे बदल होणार नसून उत्तर मध्य महाराष्ट्रात मात्र तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये वर नमूद केल्याप्रमाणे औरंगाबाद, नगर, जालना, जळगाव, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात उष्णतेची लाट असणार आहे.

यावर्षी जर पाहिलं तर भरपूर पाऊस झाल्यामुळे पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर कधी नव्हे ते यावर्षी अनेक वर्षांनंतर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत चांगली थंडी सुद्धा राहिली होते. मात्र मार्च महिना सुरू होताच कडक उन्हाळ्याला सर्वांना सामोरे जावे लागत आहे. दरवर्षी होळी नंतर उन्हाचा तडाखा सुरू होतो यंदा मात्र होळीच्या अगोदरच उन्हाचा कडाका सुरू झाला आहे. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून तापमानाचा पारा 37 ते 40 अंशाच्या पुढे गेला आहे. सध्या सकाळी आठ वाजल्यापासूनच प्रखर उन्हाला सुरुवात होते आहे आणि या सगळ्याचा परिणाम जनजीवनावर होताना दिसत आहे. वाढत्या उन्हामुळे 11 ते 4 वाजेपर्यंत सर्व रस्ते पूर्णतः निर्मनुष्य दिसत आहेत. बाजारपेठेत देखील शुकशुकाट जाणवत आहे.

Updated : 30 March 2022 5:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top