Home > News > ट्विटरनंतर आता इन्स्टाचा 'कंगनाशी पंगा'; संतापलेली कंगना म्हणते...

ट्विटरनंतर आता इन्स्टाचा 'कंगनाशी पंगा'; संतापलेली कंगना म्हणते...

आधीच कंगनाचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड असताना इन्स्टाग्रामने सुध्दा झटका दिला आहे

ट्विटरनंतर आता इन्स्टाचा कंगनाशी पंगा; संतापलेली कंगना म्हणते...
X

खळबळजनक वक्तव्य आणि वादग्रस्त विधान करून कायम वाद ओढावून घेणारी अभिनेत्री कंगना रणौतला ट्विटवर नंतर आता इन्स्टाग्रामने झटका दिला आहे. वादग्रस्त पोस्ट केली म्हणत इन्स्टाग्रामने कंगनाची पोस्ट डिलीट केली आहे.

कंगनानं शनिवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सांगितलं होतं, की तिला कोरोनाची लागण झाली आहे. याचवेळी तिनं कोरोना साधा ताप असल्याचं सुद्धा म्हटलं होतं. तिच्या या पोस्टवरुन वाद झाल्यानं इन्स्टाग्रामनं ही पोस्ट डिलीट केली.त्यामुळे संतापलेल्या कंगनानं पुन्हा एक पोस्ट करत म्हंटलं आहे की, "इन्स्टाग्रामनं माझी पोस्ट डिलीट केली आहे. यात मी कोरोनाला संपवण्याची धमकी दिली होती. यामुळे कोणाच्यातरी भावना दुखावल्या. इन्स्टावर मला दोनच दिवस झालेत, मात्र इथे मी एका आठवड्यापेक्षा अधिक काळ टिकेल, असं वाटत नाहीये.
आधीच कंगनाचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड असताना इन्स्टाग्रामने सुध्दा पोस्ट डिलीट केली आहे. त्यामुळे आता इन्स्टाग्रामवर कंगना किती दिवस राहील हे पाहणं महत्वाचं ठरेल.

Updated : 10 May 2021 5:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top