Home > News > तीन महिन्यात Infosys ला झाला हजारो कोटींचा नफा..

तीन महिन्यात Infosys ला झाला हजारो कोटींचा नफा..

तीन महिन्यात Infosys ला झाला हजारो कोटींचा नफा..
X

IT क्षेत्रातील नामांकित कंपनी Infosys ने गुरूवारी (13 एप्रिल) Q4FY23 म्हणजेच चौथ्या तिमाहीचे (जानेवारी-मार्च) उत्पन्न जाहीर केले आहेत. या तिमाहीत इन्फोसिसचा एकत्रित निव्वळ नफा 7.8% वार्षिक (YoY) वाढून 6 हजार 128 कोटी रुपये झाला आहे.

मागील वर्षीच्या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 5 हजार 686 कोटी रुपये होता. मागील तिमाहीत म्हणजे Q3FY23 मध्ये, निव्वळ नफा 6 हजार 586 कोटी होता. तिमाही आधारावर कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे. इन्फोसिसचे निकाल बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमी आहेत.

चौथ्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात 16% वाढ..

FY23 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 16% वाढून रु. 37 हजार 441 कोटी झाला. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीत ते 32 हजार 276 कोटी रुपये होते. त्याचवेळी डिसेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल 38 हजार 318 कोटी रुपये होता. इन्फोसिसने आर्थिक वर्ष 2023-24 (FY24) साठी महसुलात 4 ते 7% वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.

ऑपरेटिंग नफा 13% वाढला..

या तिमाहीत कंपनीचा ऑपरेटिंग नफा रु. 7 हजार 877 कोटी होता, जो मागील वर्षीच्या तिमाहीत रु. 6 हजार 956 कोटींवरून 13% अधिक आहे. त्याच वेळी, मागील तिमाहीत कंपनीचा ऑपरेटिंग नफा 8 हजार 242 कोटी रुपये होता. इन्फोसिसचे ऑपरेटिंग मार्जिन 21% आहे, जे डिसेंबरच्या तिमाहीत 21.5% आणि मागील वर्षीच्या तिमाहीत 21.5% होते.

Updated : 14 April 2023 3:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top