Home > News > अजित पवारांची गाडी चालवणाऱ्या तृप्ती मुळीक कोण आहेत?

अजित पवारांची गाडी चालवणाऱ्या तृप्ती मुळीक कोण आहेत?

अजित पवारांची गाडी चालवणाऱ्या तृप्ती मुळीक कोण आहेत?
X

महाराष्ट्र विधिमंडळाचे 22 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन सुरू आहे. 25 आणि 26 डिसेंबर ला शनिवार आणि रविवार असल्याने अधिवेशनाला सुट्टी आहे. या दरम्यान अजित पवार हे सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर निघाले होते. अशातच त्यांच्या गाडीचं सारथ्य करण्याची संधी तृप्ती मुळीक या महिला पोलीस चालकाला मिळाली. त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत आपल्याला दिसून येतं की तृप्ती गाडी चालवत आहेत आणि मागच्या बाजूला अजित पवार बसलेले आहेत.

राज्याचे गृह राज्य मंत्री सतेज पाटील यांनी देखील 'नारी शक्ती' या नावाने एक फेसबुक पोस्ट केली आहे. यात त्यांनी तृप्ती मुळीक यांचं कौतुक करत त्यांच्या बद्दल माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत तसेच गृहराज्य मंत्री सतेज पाटील स्वतः या गाडीत बसलो होते. "त्यांचे ड्रायव्हिंग कौशल्य वाख्याण्याजोगे असून राज्यातील तरुणींना त्या एक प्रेरणा देणारे आहे. या प्रसंगामुळे माझ्या मनात माझ्या पोलीस विभागाबद्दलचा अभिमान अधिकच वाढला, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा!" असे म्हणत त्यांनी पोलीस दलाचेही कौतुक केले आहे.



कोण आहेत तृप्ती मुळीक?

कोल्हापुरातील अंबप पाडळी गावाच्या पोलीस कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक यांनी नुकताच व्हीआयपी सेक्युरिटी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केला आहे.

गेल्या 10 वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस विभागाच्या माध्यमातून त्या सेवा देत आहेत. पण, लहानपणापासून ड्रायव्हिंगची आवड असल्याने त्या सध्या सिंधुदुर्ग मोटार पोलीस परिवहन विभागामध्ये कार्यरत आहेत.

23 डिसेंबर, 2021 रोजी त्यांनी व्हीआयपी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केला असून आज त्यांच्या या नव्या जबाबदारीचा पहिलाच दिवस होता.

Updated : 26 Dec 2021 12:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top