Home > News > भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा कुठे बनणार ?

भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा कुठे बनणार ?

भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा कुठे बनणार ?
X


पायाभूत सुविधा विकासामधे गती येत असताना नुकत्याच कोर्टाने दिलेल्या निकालामुळे मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गी लागणार आहे, त्यातच आता बुलेट ट्रेन चक्क पाण्याखालून जाणार आहे, त्यासाठीच्या निविदा देखील जारी झाल्या आहेत. मुंबईतील कामासह मुंबई-अहमदाबाद (Mumbai-Ahmedabad) बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पाण्याखालील बुलेट मार्गाला गती देण्यासाठी गुरुवारी निविदा उघडण्यात आल्या आहेत. बुलेट ट्रेनच्या या कामासाठी अफकॉन्स आणि एलअँड टी कंपन्यानी सहभाग घेतला आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यानच्या एकुण 508.17 किमी रेल्वे ट्रॅकपैकी सुमारे 21 किमाचा भाग भुमीगत करण्याचे नियोजन आहे. भुमीगत भोगद्याचा एक प्रवेश जागा गोदरेजच्या मालकच्या जमिनीवर येतो. राज्यात बुलेट आग्रासाठी 22 डिसेंबर 2022 रोजी निविदा मागविण्यात आल्या असून 26 एप्रिल रोजी निविदा उघडल्या जातील.

"प्रस्तावित हाय-स्पीड बुलेट रेल कॉरिडॉर मुंबईच्या ठाणे खाडीतून जाणार आहे. हा भाग फ्लेमिंगो आणि जवळपासच्या खारफुटीसाठी संरक्षित अभयारण्य आहे. त्यामुळे पारिस्थितिक व्यवस्थेला कोणताही त्रास होणार नाही यासाठी बोगद्याद्वारे रेल्वे ट्रॅक समुद्राखाली बांधले जातील. ", नॅशनल हाय स्पीड रेलने सांगितले, जे बुलेट ट्रेन प्रकल्प हाताळत आहे. हा बोगदा 13.2 मीटर रुंद सिंगल ट्यूब असेल. आणि हा बोगदा सर्वात लांब रेल्वे वाहतूक असेल, तसेच भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा असेल.आवश्यकतेनुसार नवीन ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धत (NATM) आणि टनेल बोरिंग मशीन (TBM) या दोन्हींचा वापर करून बांधकाम केले जाईल. या प्रकल्पासाठी प्राधिकरणाने यापूर्वीच पाण्याखाली सर्वेक्षण केले आहे. या प्रकल्पाची अंदाजे किंमत 1.1 लाख कोटी रुपये आहे. प्रकल्पाच्या बांधकामाचा पहिला टप्पा 2026 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

सध्याच्या योजनेनुसार या मार्गावरील ट्रेन ताशी ३२० किमी वेगाने धावतील. महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प हा 508.17 किमी लांबीचा कॉरिडॉर आहे. मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांना 12 स्थानकांनी जोडले जातील. मुंबई BKC, ठाणे शिळफाटा, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, बडोदा, आनंद/नडियाद, अहमदाबाद आणि साबरमती ही बारा स्थानके आहेत. या प्रकल्पाची अंदाजे किंमत .गर्दीच्या वेळेत दर 20 मिनिटांनी आणि नॉन-पिक अवर्समध्ये दर 30 मिनिटांनी ट्रेन सुटतील. प्रत्येक दिशेने दररोज 35 ट्रेन धावतील. संपूर्ण अंतर कापण्यासाठी सुमारे एक तास 58 मिनिटे लागतील. सध्या हे अंतर कापण्यासाठी किमान आठ तास लागतात. हा बोगदा सर्वात लांब रेल्वे वाहतूक असेल, तसेच भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा असेल. हा बोगदा 13.2 मीटर रुंद सिंगल ट्यूब असेल. आवश्यता पाहुन नवीन टनेल बोरिंग मशीन (TBM) आणि ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धत (NATM) यांचा वापर करुन बांधकाम करण्यात येणार आहे. यापुर्वी पाण्याखाली प्रकल्पासाठी प्राधिकरणाने सर्वेक्षण केले आहे.

Updated : 10 Feb 2023 10:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top