टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारताच्या महिला हॉकी संघाने विजय मिळविला आहे. राणी रामपालच्या या संघाने आयर्लंडचा 1-0 असा पराभव केला. या विजयामुळे उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेशाची भारताची आशा कायम आहे. 57 व्या मिनिटाला नवनीत कौरने भारतासाठी एकमेव गोल केला. भारताला विजयाचे अंतर वाढवण्याची संधी होती. त्याला 14 पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र भारत त्याचे एका गोलमध्ये रूपांतर करू शकला नाही.
Updated : 30 July 2021 5:56 AM GMT
Next Story