Home > News > मोदी जी तुम्ही कुठे होतात... युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थिनीचा सवाल....

मोदी जी तुम्ही कुठे होतात... युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थिनीचा सवाल....

मोदी जी तुम्ही कुठे होतात... युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थिनीचा सवाल....
X

सध्या सूरू असलेलं रशिया युक्रेन युध्द संपूर्ण जगासाठी चिंतेची बाब ठरत आहे. या युध्दजन्य परिस्थितीत युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत, भारतीय माध्यमांचे प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नावर एका विद्यार्थिनीने पंतप्रधान युपीच्या निवडणूकांमध्ये व्यस्त आहेत असा आरोप करत पंतप्रधानांना त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीसाठी जबाबदार धरले आहे.

युक्रेन आणि रशियामध्ये अनेक भारतीय विद्यार्थी वैद्यकिय शिक्षणासाठी जात असतात. सध्या सुरू असलेल्या युध्दामुळे युक्रेनमध्ये अनेक विद्यार्थी अडकून पडले आहेत. भारत सरकारकडून त्यांना एउरलिफ्ट करण्याचे प्रयत्न देखील सुरू केले गेले आहेत. भारतीय माध्यमांचे काही प्रतिनिधी युक्रेनमध्ये जाऊन वार्तांकन करत आहेत. आज तक या प्रसिध्द वृत्तवाहिनीच्या वार्ताहराने तेथील अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकारकडून येणाऱ्या मदतीबद्दल विचारले.

त्यावर एका विद्यार्थिनीने पंतप्रधान मोदी निवडणूकांमध्ये व्यस्त आहेत असे आरोप केले. ती म्हणाली, " मला एक प्रश्न विचारायचा आहे. गेल्या महिन्याभरापासून मोदी कुठे होते? मोदी उत्तरप्रदेशच्या निवडणूकांमध्ये व्यस्त होते. युध्दपुरक परिस्थिती तयार होत असताना जो बायडन यांना कशी कळाली आणि मोदी यांना कशी नाही कळाली? एकही अमेरिकी नागरीक युक्रेनमध्ये का अडकून पडला नाही. आम्हीच का इथे अडकून पडलो आहोत. आम्ही सारखे आपल्याला मेल करत आहोत. भारतीय दुतावासातील संजय रावत यांना फोन करतोय पण त्यांचा फोन लागत नाही. आपण आम्हाला सीमेनर यायला सांगितलं आम्ही आलो. पण इथे येऊन काय झालंय. भारतीय दुतावासातील फक्त दोन व्यक्ती इथे आहेत. ते इथल्या २०,००० विद्यार्थ्यांना कसं सांभाळणार आहेत." इतकं .या मुलीने म्हणेस्तोवर आज तकच्या वार्ताहराने इथे लोक फार उत्तेजित झाले आहेत म्हणत पुढे जाणं भल्याचं समजलं.

हाच व्हिडीओ आता सोशल मिडीयावर व्हायरल होऊ लागला आहे. युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी व्ही यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. यासोबत मोदीजींना वाटले की ते भक्त आहेत - सुशिक्षित विद्यार्थी नाहीत युक्रेनमधून मोदी मंत्रिमंडळाच्या जनसंपर्काचा भडिमार करणारी विद्यार्थिनी LIVE असं म्हटलं आहे.

Updated : 27 Feb 2022 4:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top