Home > News > 'इंडियन पोस्ट ऑफिस' 12 हजार 828 पदांसाठी भरती..

'इंडियन पोस्ट ऑफिस' 12 हजार 828 पदांसाठी भरती..

इंडियन पोस्ट ऑफिस 12 हजार 828 पदांसाठी भरती..
X

सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन पोस्ट ऑफिस 12 हजार 828 मल्टी टास्किंग स्टाफ, ब्रँच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) आणि डाक सेवक 10 वी पास तरुणांसाठी भरती करत आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी ही बातमी शेवटपर्यंत वाचा कदाचित ही एक बातमी तुमचं आयुष्य बदलू शकते...

दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे बेरोजगारीमुळे तरुणांच्या हाताला रोजगार नाही. मिळेल ती नोकरी करण्यासाठी आजचा तरुण तयार आहे पण त्याला संधी मिळत नाही. अनेक वेळा नोकऱ्यांची संधी उपलब्ध असते पण योग्य वेळी त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळेच आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या नोकऱ्यांची संधी तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी तरुणांपर्यंत घेऊन आलो आहोत. इंडियन पोस्ट ऑफिस 12 हजार 828 मल्टी टास्किंग स्टाफ, ब्रँच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) आणि डाक सेवक 10 वी पास तरुणांसाठी भरती करत आहे. तुम्ही जर या पोस्टसाठी apply करत असाल तर त्यासाठी काय अटी आहेत? तुमची वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे? याचबरोबर या ठिकाणी अर्ज करताना तो अर्ज कसा भरायचा? हेच आपण आता पाहणार आहोत..

अर्ज करण्यासाठी, 40 वर्षांपर्यंतचे उमेदवार 11 जूनपर्यंत indiapostgdsonline.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. यानंतर उमेदवारांची निवड 10वीच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेद्वारे केली जाईल.

काय पात्रता असणं गरजेचं आहे?

उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. यासोबतच उमेदवाराला संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा काय आहे?

18 ते 40 वर्षे वयोगटातील उमेदवार टपाल विभाग भरती परीक्षेसाठी अर्ज करू शकतील. 1 जानेवारी 2023 पासून वयाची मोजणी केली जाईल. त्याचबरोबर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

पगार काय असेल?

भरती प्रक्रियेत निवड झाल्यावर, उमेदवाराला 10 हजार रुपये ते 29 हजार 380 रुपये प्रति महिना पगार दिला जाईल.

निवड अशी होईल?

40 हजाराहून अधिक पदांसाठी उमेदवारांची निवड 10वीत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. अशा परिस्थितीत, भारतीय पोस्ट ऑफिस GDS भरतीचा निकाल अर्जाच्या 2 आठवड्यांच्या आत येण्याची शक्यता आहे. उमेदवाराला कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीनंतरच अंतिम पोस्टिंग दिली जाईल.

याप्रमाणे अर्ज करा...

अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in वर जा.

मुख्यपृष्ठावर दिलेल्या नोंदणीसाठी लिंकवर क्लिक करा.

आवश्यक तपशील प्रविष्ट करून नोंदणी करा.

विनंती केलेली कागदपत्रे अपलोड करा.

अर्ज फी जमा करून फॉर्म सबमिट करा.

Updated : 24 May 2023 7:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top