Home > News > "जात जाता जात नाही"; महिला हॉकी संघाच्या खेळाडूच्या कुटुंबीयांचे गंभीर आरोप

"जात जाता जात नाही"; महिला हॉकी संघाच्या खेळाडूच्या कुटुंबीयांचे गंभीर आरोप

महिला हॉकी संघाच्या खेळाडू वंदना कटारिया यांच्या कुटुंबियांनी काही उच्च जातीतील लोकांनी आपल्याला व वंदनाला शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे

जात जाता जात नाही; महिला हॉकी संघाच्या खेळाडूच्या कुटुंबीयांचे गंभीर आरोप
X

एकीकडे भारतीय पुरूष हॉकी संघाने जर्मनीचा पराभव करत इतिहास रचला असतांना, आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या महिला हॉकी संघाच्या सामान्याकडे. सेमीफाइनलमध्ये भारतीय महिल संघ जरी पराभुत झाला असला तरी संपुर्ण देशवासियांकडून महिला संघाला प्रोत्साहन दिलं जात आहे.याच दरम्यान भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडू वंदना कटारिया यांच्या कुटुंबीयांनी एक गंभीर आरोप केला आहे.

वंदना कटारिया यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, भारतीय महिला संघाचा सेमीफाइनलमध्ये पराभव झाल्यानंतर काही उच्च जातीतील लोकांनी जातीयवादी नावे घेत तिला शिव्या दिल्या.दरम्यान याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. वंदना कटारिया हरिद्वारच्या रोशनाबाद गावात राहते तिच्या घराशेजारी राहणाऱ्या उच्च जातीतील दोन व्यक्तींनी तिच्या घरासमोर येऊन जातीवाचक शिवीगाळ केली, आणि घरासमोर फटाके फोडले असा आरोप तिच्या घरच्यांनी केला. शिवाय त्यांनी 'भारतीय टीम यासाठी पराभुत झाली कारण भारतीय संघात प्रमाणापेक्षा जास्त दलित खेळाडू आहेत' असं म्हटल्याचे वंदना यांच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

भारतीय महिला संघ पराभुत झाल्यानंतर आमच्या घरासमोर बराच वेळ गोंधळ सुरू होता असंही त्यांच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे.या घटनेनंतर पोलिसांनी गांर्भियाने दखल घेत कारवाई केली आहे. संबधित व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Updated : 5 Aug 2021 6:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top