Home > News > India vs West Indies Women's World ; स्मृती मानधनने झळकवले 22 वे अर्धशतक..

India vs West Indies Women's World ; स्मृती मानधनने झळकवले 22 वे अर्धशतक..

India vs West Indies Womens World ;  स्मृती मानधनने झळकवले 22 वे अर्धशतक..
X

महिला विश्वचषकात भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध तिसरा सामना खेळत आहे. स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर सध्या धावपट्टीवर खेळत आहेत. भारतीय संघाने 30 षटकांत तीन गडी बाद 160 धावा केल्या. स्मृती मानधन 65 तर हरमनप्रीत 38 धावांवर खेळत आहे. स्मृती मानधनाने चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. स्मृतीचे हे वनडेतील २२ वे अर्धशतक आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.


दीप्ती शर्मा मोठी खेळी खेळू शकली नाही: गेल्या दोन सामन्यांप्रमाणेच, टीम इंडियाचा वरचा क्रम वेस्ट इंडिजविरुद्ध पूर्णपणे फ्लॉप होता. दीप्ती शर्माने चांगली सुरुवात केली होती, पण अनिसा मोहम्मदच्या चेंडूला स्वीप करण्याच्या प्रयत्नांत स्लिपमध्ये उभ्या असलेल्या मॅथ्यूजच्या हाती कॅच घेत ती बाद झाली. दीप्तीने 21 चेंडूत 15 धावा केल्या.
मिताली राजचा खराब फॉर्म या मॅच मध्ये देखील पाहायला मिळाला. टीम इंडियाची कर्णधार मिताली राज अवघ्या 5 धावा करून बाद झाली. त्याने शमिला कोनेलच्या चेंडूवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, पण मिडविकेटवर तिला सोपा कॅच घेत तिला बाद करण्यात आले. मितालीने विश्वचषकात तीन सामने खेळले असून तिच्या ती एकही अर्धशतक झळकवु शकलेली नाही.

यस्तिका भाटिया 31 धावांवर बाद:

सलामीवीर यस्तिका भाटियाने टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली आणि अवघ्या 21 चेंडूत 31 धावा केल्या, पण तिला मोठी खेळी खेळता आली नाही. शकेरा सेलमनच्या चेंडूवर भाटियाने सोपा झेल घेतला.


Updated : 12 March 2022 3:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top