Home > News > देशावर कोरोनाच्या चौथ्या लाटेचे सावट..

देशावर कोरोनाच्या चौथ्या लाटेचे सावट..

काल दिवसभरात महाराष्ट्रात 155 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सर्वाधिक ९४ रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 998 सक्रिय कोरोनाचे रुग्ण आहेत.

देशावर कोरोनाच्या चौथ्या लाटेचे सावट..
X

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे नवीन 3 हजार 324 नवे रुग्ण आढळले आहेत तर 40 जणांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात 2 हजर 800 लोक बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या देशात दिल्लीत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. दिल्लीत काल नवीन 1 हजर 520 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या देखील आता 19 हजार 092 पर्यंत वाढली आहे. दिल्लीत सक्रिय रूग्णांची संख्या 5 हजार 716 वर पोहोचली आहे, जी 9 फेब्रुवारीपासून सर्वाधिक आहे.

काल दिवसभरात महाराष्ट्रात 155 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सर्वाधिक ९४ गुन्हे दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात 998 सक्रिय कोरोनाचे रुग्ण आहेत.

केंद्र सरकारचे आकडे काय सांगतात?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजारांच्या पुढे गेली आहे. त्याच वेळी, एकूण संसर्गाच्या 0.04% सक्रिय रुग्ण आहेत. तर बरे होण्याचा दर 98.74 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Updated : 1 May 2022 5:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top