Home > News > करोनाचा उद्रेक सुरुच, देशात 24 तासात 2 लाख 17 हजार नवे रुग्ण

करोनाचा उद्रेक सुरुच, देशात 24 तासात 2 लाख 17 हजार नवे रुग्ण

करोनाचा उद्रेक सुरुच, देशात 24 तासात 2 लाख 17 हजार नवे रुग्ण
X

देशात पुन्हा एकदा एका दिवसात कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या 2 लाखांच्या वर गेली आहे. भारतात गेल्या चोवीस तासात 2 लाख 17 हजार 353 रुग्ण आढळून आले आहेत. तर मृतांची संख्या 1 हजार 185 एवढी आहे. गेल्या चोवीस तासात 1 लाख 18 हजार 302 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत देशात कोरोनाच्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या 15 लाख 69 हजार 743 एवढी झाली आहे. तर मृतांची एकूण संख्या 1 लाख 74 हजार 308 झाली आहे. आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 1 कोटी 42 लाख 91 हजार 917 आहे, तर 1 कोटी 25 लाख 47 हजार 866 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना सरकारने लसीकरण सुरू केले आहे.

Updated : 16 April 2021 7:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top