Home > News > उत्तर प्रदेशात दलित अत्याचारांनी परिसीमा गाठली: प्रियंका गांधी

उत्तर प्रदेशात दलित अत्याचारांनी परिसीमा गाठली: प्रियंका गांधी

उत्तर प्रदेशात दलित अत्याचारांनी परिसीमा गाठली: प्रियंका गांधी
X

उत्तर प्रदेशमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर महिला व दलित समाजावरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेश आता अशीच एक घटना समोर आली आहे. एका दलित मुलीला मारहाण करत असलेला व्हिडिओ काँग्रेसचा महासचिव प्रियंका गांधी यांनी ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये तीन पुरुष काठीने एका मुलीला मारताना दिसत आहेत. या ठिकाणी काही महिला देखील उपस्थित असल्याचं या व्हिडीओ मध्ये दिसत आहे. प्रियंका गांधी यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त व्यक्त केला आहे.

ही घटना समोर आल्यानंतर प्रियांका गांधी यांनी योगी सरकारवर देखील जोरदार टीका केली आहे. 'योगी आदित्यनाथ आपल्या राज्यामध्ये रोज 34 दलितांवर तर 135 महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत तरीसुद्धा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था झोपलेली आहे. पुढच्या चोवीस तासाच्या आत जर हे अमानवीय कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांना पकडलं गेलं नाही तर काँग्रेस पार्टी जोरदार आंदोलन करेल आणि तुम्हाला जाग करेल.' असं त्यांनी ट्विट करत म्हंटल आहे.Updated : 29 Dec 2021 7:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top