Home > News > पुस्तकांच्या दुकानांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करा: नीलम गोऱ्हे

पुस्तकांच्या दुकानांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करा: नीलम गोऱ्हे

पुस्तकांच्या दुकानांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करा: नीलम गोऱ्हे
X

Courtesy -Social media

पुस्तकांच्या दुकानांना घरपोच सेवा व मर्यादित वेळेसाठी दुकाने सुरू करू द्यावे अशी मागणी, शिवसेना नेत्या आणि विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे. त्यांनी तसं पत्र सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे.



नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई,नगरविकास मंत्री विजय विडेट्टीवार यांना पत्र लिहून मागणी केली आहे की,कोरोना काळात लोकांच मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असून,मनोबल वाढविण्यामध्ये साहित्य मोठी भूमिका बजावत असते आणि साहित्यातुन माणसाला उमेदही मिळत असते.




त्यामुळे बाकीच्या अनेक प्रकारच्या दुकानांना जशी परवानगी देण्यात आली तशीच, पुस्तकांच्या दुकांना देऊन त्यांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करण्याची विनंती नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. तसेच ही परवानगी ताबडतोब अंमलात आणावी त्याचबरोबर, इतर दुकानदारांकडून जश्या बाकीच्या वस्तू घरपोच दिल्या जाऊ शकतात, त्याचप्रमाणे ही पुस्तक सुद्धा घरपोच देण्याची व्यवस्था जे दुकानदार करतील त्यांना तशी परवानगी द्यावी. त्यामुळे त्वरित पुस्तकांच्या दुकानांच्या बद्दलचे निर्बंध आपण बदलून त्यांना अत्यावश्यक सेवेमध्ये पुस्तकांच्या दुकानांत समाविष्ट करावा,अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

Updated : 2 Jun 2021 5:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top