Home > News > औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयात महिला तक्रार निवारण केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयात महिला तक्रार निवारण केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयात महिला तक्रार निवारण केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन
X

पोलीस अधिक्षक कार्यालय, औरंगाबाद (ग्रामीण) येथील महिला तक्रार निवारण केंद्र व भरोसा सेलच्या अद्यावत इमारतीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे हस्ते आणि पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या उपस्थितीत आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या कक्षाच्या कामकाजाची सविस्तर माहिती जाणुन घेतली. कौटुंबिक समस्या, वादविवाद या भरोसा सेल च्या माध्यमातून सोडविल्यास त्यांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले.

पोलीसांसह मानसोपचार तज्ज्ञ, वकील तसेच समाजकल्याण अधिकारी यांचे सहकार्याने तक्रारदारांचे अधिक चांगल्या प्रकारे समुपदेशनाचे कार्य होईल. त्यामुळे बरेच कुटुंब तुटण्यापासून वाचतील. नागरिकांच्या जीवनात विश्वास असणे हेही एक प्रकारे विकासाचे प्रतिक आहे, असे मतही जिल्हाधिकारी शचव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच या भरोसा सेल साठी विविध साधन सामुग्रीची आवश्यकता भासल्यास मदत करण्यात येईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.

तर, सद्यस्थितीत विशेषतः करोना कालावधीत सर्वांवर जो आर्थिक मानसिक ताण आलेला आहे. त्याचे रूपांतर गुन्ह्यांमध्ये होण्यास वेळ लागत नाही करिता कौटुंबिक हिंसाचार अथवा धोंड्या निमित्त छळ बाबत काही तक्रार असल्यास त्याची त्वरित नोंदणी पोलीस स्टेशनला करणे बंधनकारक आहे. याचबरोबर तक्रार कशी नोंदवावी, कुठे नोंदवावी याव्यतिरिक्त जर महिला ज्येष्ठ नागरिक अथवा लहान मुला संबंधित तक्रारी असल्यास त्यांना लागणारी प्रत्येक मदत मिळवून देण्यासाठी भरोसा सेल स्थापन करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली.

आपण ज्याच्यावरच भरोसा टाकतो जी यंत्रणा अथवा जी व्यक्ती आपल्याला योग्य ती दिशा दाखवू शकेल, त्याकरिताच बेसिक पॉलिसींचा एक भाग म्हणून सदर सेल स्थापन करण्यात आले आहे. मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण

Updated : 29 July 2021 2:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top