Home > News > मातृत्वसंकल्पनेचा बहुआयामी वेध घेणारा 'द ओल्डेस्ट लव्ह स्टोरी' लेखसंग्रह प्रकाशित..

मातृत्वसंकल्पनेचा बहुआयामी वेध घेणारा 'द ओल्डेस्ट लव्ह स्टोरी' लेखसंग्रह प्रकाशित..

मातृत्वसंकल्पनेचा बहुआयामी वेध घेणारा द ओल्डेस्ट लव्ह स्टोरी लेखसंग्रह प्रकाशित..
X

मातृत्व हे अनादिकालापासून विचारवंत -तत्वज्ञ साहित्यिकांना प्रेरित करणारे एक सनातन गूढ आहे. जगाच्या सांस्कृतिक इतिहासात 'मातृत्व ' ही सर्वात गौरवशाली संकल्पना आहे व एक सुवर्ण मानक 'द ओल्डेस्ट लव्ह स्टोरी' मानली गेली आहे. पण या संकल्पनेचा वास्तवदर्शी आलेख काही वेगळेच सत्य सांगताना दिसतो. या विरोधाभासाचे आयाम व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिका, समीक्षक, लघुपटदिग्दर्शक रिंकी रॉय भट्टाचार्य आणि पत्रकार मैथिली राव यांनी संपादन केलेल्या 'द ओल्डेस्ट लव्ह स्टोरी या लेखसंग्रहाचे प्रकाशन काल बांद्रा येथे अभिनेत्री पद्मश्री शबाना आझमी यांच्या हस्ते पार पडले.


'द ओल्डेस्ट लव्ह स्टोरी' या ग्रंथामध्ये मातृत्व आणि वात्सल्य या संकल्पनांच्या जुन्या नव्या पैलूंची विस्तृत बहुआयामी मांडणी करण्यात आली आहे. ओम बुक्स इंटरनॅशनलतर्फे प्रकाशित 'द ओल्डेस्ट लव्ह स्टोरी ' च्या प्रकाशन समारंभाला अभिनेत्री पद्मश्री शबाना आझमी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या पुस्तकामध्ये शबाना आजमी यांनी सुद्धा त्यांच्या आई अभिनेत्री शौकत आझमी यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारा त्यांचा खास लेखही लिहिला आहे.
आणखीन खास गोष्ट म्हणजे, या संग्रहामध्ये 'महाभोज' आणि 'आपका बंटी' यासारख्या अभिजात साहित्यकृतींच्या लेखिका मन्नू भंडारींसह कमला दास, शशी देशपांडे, नबनीता देव -सेन तसेच जानकी श्रीनिवास मूर्ती, सी. एस. लक्ष्मी या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका याच्या लेखांचा देखील समावेश आहे. यासोबत दलित लेखिका कार्यकर्त्या उर्मिला पवार, ज्येष्ठ कथा -पटकथाकार सुधा अरोरा, लेखिका - अनुवादक सरोज बावडेकर, प्राध्यापिका साहित्यिका रोशन जी शहानी आणि टुटून मुखर्जी, अमेरिकास्थित कथालेखिका सीता भास्कर या वैविध्यपूर्ण वैचारिक पार्श्वभूमी असणाऱ्या इंग्लिश, मराठी, कन्नड, हिन्दी,तामिळ आणि बांगला मधल्या ज्येष्ठ साहित्यिकांच्या लेखांचा समावेश केला गेला आहे. तसेच चित्रपट समीक्षेसाठी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दीपा गहलोत, राज्य-आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त रंगकर्मी चित्रा पालेकर, ज्येष्ठ चित्रकर्मी ललिता लाजमी, लघुपटदिग्दर्शक रूपा बारुआ यांचेही लेख या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत.या सगळ्या नावांवरूनच या संग्रहात उमटलेल्या बहुआयामी दृष्टिकोनांच्या विविधतेची आणि व्यापकतेची कल्पना आणि अनुभवचित्रण मांडणारे लेख, किशोरवयीन मुलाने निर्माण केलेल्या लेकींनी आपल्या कर्तुत्ववान आयांच्या आठवणींची केलेली उजळण, स्वतःच्या मातृत्वाबद्दल अपारंपरिक विचार वाद्ळांचा सामना करणाऱ्या आईची कथा, पतीच्या निधनानंतर दोन लेकांना धैर्याने वाढवणाऱ्या आईचे आत्मकथन डाऊन्स सिण्ड्रोम असलेल्या मुलाच्या विकासासाठी धडपणाऱ्या दृढनिश्चयी आईचे अनुभव, तीन मुलांचा बाप असलेल्या विधुराशी लग्न करण्याच्या निर्णयामुळे आलेल्या जवाबदारीचे निष्ठेने पालन करण्याच्या स्त्रीचे चित्रण अशा वैविध्यपूर्ण चोवीस कथा -कथनांचा कोलाज इथे उमटला आहे.

Updated : 3 Jun 2022 6:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top