Home > News > करोना युद्धात आपण प्रत्येक जण सैनिक आहोत – अभिनेत्री अश्विनी भावे

करोना युद्धात आपण प्रत्येक जण सैनिक आहोत – अभिनेत्री अश्विनी भावे

करोना युद्धात आपण प्रत्येक जण सैनिक आहोत – अभिनेत्री अश्विनी भावे
X

महाराष्ट्रात करोना विषाणूचा फैलाव फार मोठ्याप्रमाणात होत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. यावर अभिनेत्री अश्विनी भावे यांनी फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट केला आहे.

काय म्हणाल्या अश्विनी भावे.... तुम्ही सगळे लॉकडाऊनमध्ये आहात प्रत्येकांच्या मनावर अस्थिरतेचं वातावरण आहे. गेल्या वर्षी जे झालं ते पुन्हा होऊ पाहतंय. आणि त्यासाठी आपल्या मनाची तयारी नाही. हा करोना विषाणू नावाचा शत्रू आपल्या घरात येऊन ठेपलाय. म्हणून या युद्धात प्रत्येक जण सैनिक आहोत. आणि स्वतःचं संरक्षण करणं आपल्याच हातामध्ये आहे. गरज नसली तर घराच्या बाहेर पडू नका. घराच्या बाहेर पडताय तर मास्क नक्की लावा, सॅनिटायझरचा वापर करा. घरात रहा.. स्वतःची काळाजी घ्या... असं आवाहन अभिनेत्री अश्विनी भावे यांनी केलं आहे. पाहा हा व्हिडिओ...

Updated : 2021-04-20T14:12:34+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top