Home > News > स्वतःच्याच मुलीला अमानुष मारहाण करणाऱ्या बापाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

स्वतःच्याच मुलीला अमानुष मारहाण करणाऱ्या बापाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

स्वतःच्याच मुलीला अमानुष मारहाण करणाऱ्या बापाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
X

चेंबुरमध्ये वडिलांनी शुल्लक कारणावरून आपल्या अल्पवयीन मुलीला अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. महेश इतापे असं आरोपीचे नाव असुन याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीवर भारतीय दंड संहितेनुसार कलम ३२३, ३२४ आणि बाल न्याय अधिनियम २०१५ नुसार कलम ७५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

चेंबुरच्या लाल डोंगर परिसरातील अल्टाव्हिस्टा इमारतीतील रहिवाशी महेश इतापे यांचा स्वतःच्या मुलीला मारतानाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परिसरातील कोरोना निर्मुलन समितीने तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

या घटनेची माहिती मिळताच चाईल्ड हेल्पलाईन च्या महिला अधिकाऱ्यांनी देखील पिडीत मुलीची चौकशी केली. या घटनेत मुलीला वडिलांकडे ढकलणारी महिला ही पिडीत मुलीची सावत्र आई आहे. शेजाऱ्यांनी फैलावर घेतल्यावर सदर महिलेने माफी मागितली आहे.

अशा घटना या वारंवार घडत असतात. संबंधितांवर यानंतर कारवाई देखील केली जाते. परंतु अशा घटनांमधील संबंधितांचे मानसिक समुपदेशन देखील होणे गरजेचे आहे.

Updated : 22 Sep 2021 3:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top