Home > News > उष्णतेचा विक्रम, मार्च महिन्यात तापमानाने 121 वर्षांचा विक्रम मोडला / Heat broke 121-year-old record

उष्णतेचा विक्रम, मार्च महिन्यात तापमानाने 121 वर्षांचा विक्रम मोडला / Heat broke 121-year-old record

यावर्षी मार्च महिन्यातच तापमानाने 121 वर्षांचा विक्रम मोडला आहे. 1901 नंतर प्रथमच मार्चमध्ये देशातील अनेक शहरांमध्ये पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. या वर्षी मार्चमध्येच सरासरी कमाल तापमान 1901 पासून सामान्य तापमानापेक्षा 1.86 अंश सेल्सिअस जास्त आहे.

उष्णतेचा विक्रम, मार्च महिन्यात तापमानाने 121 वर्षांचा विक्रम मोडला / Heat broke 121-year-old record
X

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच देशात कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. यंदा मार्च महिन्यातच उष्णतेने आपली तीव्रता दाखवायला सुरुवात केली. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी मार्च महिन्यात तापमानाने 121 वर्षांचा विक्रम मोडला आहे. 1901 नंतर प्रथमच मार्चमध्ये देशातील अनेक शहरांमध्ये पारा 40 अंशांच्या पुढे गेला. या वर्षी मार्चमध्ये सरासरी कमाल तापमान 1901 पासून सामान्य तापमानापेक्षा 1.86 अंश सेल्सिअस जास्त होते. हा पारा कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. येत्या काही दिवसांत देशातील 9 राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

उष्ण हवामानाचे करणे काय आहेत जाणून घेऊयात..

हवामान खात्याच्या माहितीनुसार, या वर्षी मार्चमध्ये दिवसाचे सरासरी तापमान 33.01 अंश सेल्सिअस होते, तर 1901 मध्ये सरासरी तापमान 32.5 अंश सेल्सिअस होते. उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात यावर्षी मार्चमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. राजधानी दिल्लीत सरासरी तापमान ३६.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

पाऊसही सरासरीपेक्षा ७१ टक्के कमी होता

हवामान विभागाच्या मते, या वर्षी मार्चमध्ये सरासरी 8.9 मिमी पाऊस पडला आहे, जो 30.4 मिमीच्या दीर्घ कालावधीच्या सरासरीपेक्षा (LPA) 71% कमी आहे. यापूर्वी मार्च 1909 मध्ये 7.2 मिमी पाऊस पडला होता, तर 1908 मध्ये 8.7 मिमी पाऊस पडला होता. अशा स्थितीत गेल्या महिन्यात १९०१ नंतरचा तिसरा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

9 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा

अलर्ट जारी करताना IMD ने म्हटले आहे की, पुढील काही दिवसांत मध्य प्रदेश, राजस्थान, पूर्व उत्तर प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, दिल्ली, गुजरात, झारखंड आणि विदर्भात उष्णतेची लाट येऊ शकते. या काळात नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन विभागाने केले आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ४ ते ८ एप्रिल दरम्यान तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.





इतकी उष्णता वेळेपूर्वीच का ?

स्कायमेट वेदरच्या म्हणण्यानुसार, उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या कमी प्रभावामुळे वाऱ्याचा वेग कमी होतो. त्यामुळे तापमानात वाढ होते. यंदा वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात संपला आहे. या कारणास्तव तीव्र उष्णतेचा परिणाम उत्तर आणि मध्य भारतात वेळेपूर्वी दिसून आला. या कारणास्तव, या वर्षी मार्चमध्ये सतत कोरडे आणि उष्ण, पश्चिमेकडील वारे होते.





Updated : 2 April 2022 1:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top