लातुरात मुंडेचा साठ लाखांचा पुतळा, विलासरावांच्या शेजारी मुंडेंचा पुतळा
X
लातूर जिल्हापरिषदेच्या प्रांगणात स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या शेजारी गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्यासाठी साठ लाखांचा खर्च येणार असून माजी ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
काँग्रेसची सत्ता असताना लातूर जिल्हापरिषदेच्या प्रांगणात विलासराव देशमुख यांचा पुतळा उभारण्यात आला होता. आता जिल्हापरिषदेत भाजपची सत्ता असून भाजपाने विलासरावांच्या शेजारीच गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. विलासराव आणि गोपीनाथ मुंडे ये घट्ट मित्र समजले जायचे. त्यामुळे या दोघांचे पुतळे बाजूबाजूला असणं हा राजकीय योगच होणार आहे. मात्र, एंकदरीतच सध्या देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यानंतर पुतळे उभारण्याएवजी आरोग्य सेवांच्या आधुनिकीकरणावर जिल्हापरिषदेने खर्च करायला पाहिजे असं मत नागरिक व्यक्त करत आहेत. 60 लाखांच्या पुतळ्याची खरंच लातूर ला गरज आहे का असा सवाल ही विचारला जात आहे.
आभार...
राहुल हा निर्णय राजकारणातील दोन आदर्श आणि उत्तम मैत्री यांचे मूर्तिमंत उदाहरण.. https://t.co/tgY75GMuAy
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 18, 2020