Home > News > शिक्षकी पेशाला काळीमा! कोल्हापूरात शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

शिक्षकी पेशाला काळीमा! कोल्हापूरात शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

कोल्हापूरात अल्पवयीन मुलीचा शिक्षकाकडूनच विनयभंग झाल्याची घटना घडली आहे.

शिक्षकी पेशाला काळीमा! कोल्हापूरात शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग
X

कोल्हापूरमध्ये भुदरगड तालूक्यातील लोटेवाडी गावच्या विद्या मंदिर लोटेवाडी या प्राथमिक शाळेतील महादेव हाळवणकर पाचवडे या शिक्षकाने ६ वी च्या विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित शिक्षकाने केलेल्या कृत्याची माहिती पीडित मुलीने आपल्या आईवडिल व नातेवाईक यांना दिल्यानंतर शिक्षकाने उडवा उडवीची उत्तरे दिली. हा प्रकार समस्थ ग्रामस्थांना समजल्यानंतर ग्रामस्थांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना घेराव घालून जाब विचारला.


तर नराधम शिक्षकाला गावकऱ्यांनी शाळेमध्ये २ तास डांबून ठेवले होते. यानंतर ग्रामस्थांनी या नराधम शिक्षकाला चांगलाच चोप दिला. ही घटना समजताच भुदरगड पोलिसांनी या शिक्षकाला ताब्यात घेतले त्याला गारगोटी ग्रामीण रुग्णालय मध्ये तपासणीसाठी नेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.


मिळालेल्या माहितीनुसार पिडीत विद्यार्थिनी आरोपी शिक्षकाच्या वर्गात शिकत होती. सोमवारी अल्पवयीन मुलगी ही वर्गात आली असताना शिक्षकाने तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी भुदरगड पोलिसांनी विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवन्याचे काम सुरू होते.

Updated : 30 March 2022 11:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top