Home > News > चिंताजनक - बुलडाण्यात 18 दिवसात 43 महिला तसेच मुली बेपत्ता

चिंताजनक - बुलडाण्यात 18 दिवसात 43 महिला तसेच मुली बेपत्ता

चिंताजनक - बुलडाण्यात 18 दिवसात 43 महिला तसेच मुली बेपत्ता
X

गेल्या काही दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यामध्ये अनेक महिला तसेच मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. फक्त १८ दिवसात ४३ महिला व मुली बेपत्ता झाल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून १ जानेवारी ते १८ जानेवारी २०२२ या फक्त १८ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील २९ महिला व १४ अल्पवयीन मुली अश्या एकूण ४३ महिला/ मुली बेपत्ता असल्याची आकडेवारी समोर आली आहे. यापैकी ७ अल्पवयीन मुली व १२ महिलांचा शोध घेण्यास पोलिस प्रशासनाला यश आले आहे.

याबद्दल तपशीलात बोलताना महिला आणि बाल अत्याचार प्रतिबंधक कक्षाच्या पोलिस उपनिरीक्षक पी. एस. उमाळे यांनी सांगितले की, " ही बातमी आम्ही वर्तमानपत्रात पाहिली. पोलिस अधिक्षक अरविंद चावरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष मोहिम राबवली गेली. या मोहिमे अंतर्गत ज्या घरातूम पळून गेलेल्या किंवा घर सोडून गेलेल्या महिलांचा शोध घेतला गेला. यामध्ये आतापर्यंत १९ महिला सापडल्या असून त्यांना त्यांच्या कुटूंबाकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे. तसेच इतर महिलांचा गांभिर्य़ाने शोध घेत आहेत.

या महिला बेपत्ता होण्यामागे अनेक कारणं आहेत त्यामध्ये विशेषतः १८ वर्षाखालील ज्या मुली आहेत त्यांनी घर सोडण्याचं कारण म्हणजे त्यांना त्यांच्या कुटूंबाकडून लावले जाणारे निर्बंध नको असतात. त्यांना स्वेच्छेप्रमाणे स्वतःचं आय़ुष्य जगायचं असतं. तर काही या प्रेम संबंधामुळे घरातून पळून जातात, त्यांचं स्वतःच आयुष्य सुरू करतात आणि पोलिसांना कळवत देखील नाहीत. लज्जेखातर यांचे नातेवाईकही पोलिसांना कोणतीही माहिती कळवत नाहीत.

Updated : 25 May 2022 8:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top