Home > News > कौतुकास्पद! नऊ दिवसांच्या बाळासह महिला सरपंचाची बैठकीला हजेरी

कौतुकास्पद! नऊ दिवसांच्या बाळासह महिला सरपंचाची बैठकीला हजेरी

कौतुकास्पद! नऊ दिवसांच्या बाळासह महिला सरपंचाची बैठकीला हजेरी Igatpuri woman sarpanch attends monthly meeting with nine-day old baby

कौतुकास्पद! नऊ दिवसांच्या बाळासह महिला सरपंचाची बैठकीला हजेरी
X

नाशिक: इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या मायदरा-धानोशी ग्रामपंचायतच्या सरपंच पुष्पा बांबळे यांनी आपल्या नऊ दिवसांच्या लहान बाळासह ग्रामपंचायत मासिक मिटींगला उपस्थिती दर्शवली. त्यांच्या या कामाचं सोशल मिडियावर कौतुक होत आहे.

मायदरा-धानोशी ग्रामपंचायतच्या सरपंच पुष्पा बांबळे यांनी नऊ दिवसांपूर्वी गोडस मुलीला जन्म दिला. तर मंगळवारी ग्रामपंचायतची मासिक मीटिंग अजेंडा देऊन आयोजित करण्यात होती. मात्र बाळंत असतनाही पुष्पा बांबळे या जन्म दिलेल्या नऊ दिवसांच्या गोंडस मुलीसह ग्रामपंचायत मासिक मिटींगला सामाजिक अंतर राखत उपस्थित राहिल्या.

या मासिक मीटिंगमध्ये सरपंच बांबळे यांनी गाव विकासाच्या दृष्टीने गावातील पाणी पुरवठा, विजेचे प्रश्न, दलित वस्तीतील मंजूर पथदिवे,घरकुल योजने संदर्भात सविस्तर माहिती,गावातील शिवार रस्ते या प्रश्नासंदर्भात आढावा घेतला. दरम्यान नुकतेच नऊ दिवसांच्या जन्म दिलेल्या बाळासह सरपंच पुष्पा बांबळे या ग्रामपंचायत मासिक मिटींगला उपस्थित राहिल्या व त्यांनी गाव विकासाची कामे मीटिंग मध्ये मांडली त्यामुळ गावात आणि पंचक्रोशीत त्यांची चर्चा असून, कौतुकही केलं जात आहे.

दरम्यान एक लोकप्रतिनिधी या नात्याने गावातील ग्रामस्थांच्या समस्या सोडविणे त्यांचे विविध प्रश्न शासन स्तरावर मांडणे हे माझं कर्तव्य समजते असे यावेळी सरपंच पुष्पा बांबळे यांनी म्हणाल्यात.

Updated : 30 Jun 2021 10:14 AM GMT
Next Story
Share it
Top