Home > News > लग्नाच्या बतम्यांनंतर IAS टीना दाबी यांचा सोशल मीडियाला रामराम..

लग्नाच्या बतम्यांनंतर IAS टीना दाबी यांचा सोशल मीडियाला रामराम..

IAS Teena Dabi IAS pradip gawande लग्न करणार असल्याची बातमी व्हायरल झाल्यामुळे त्यांच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंटवरून अनेक जण त्यांचे अभिनंदन करत होते. त्याचवेळी अनेक जण त्यांना ट्रोलही करत होते. त्यानंतर आता त्यांनी सोशलमीडियावरील इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट बंद केले आहे..

लग्नाच्या बतम्यांनंतर IAS टीना दाबी यांचा सोशल मीडियाला रामराम..
X

UPSC 2015 बॅच टॉपर IAS टीना दाबी, ज्या इन्स्टाग्राम (Instagram) आणि फेसबुकवर (Facebook) अत्यंत लोकप्रिय आहेत, याच IAS टीना दाबी यांनी आता स्वतःला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपासून त्या त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. त्यानंतर त्यांनी काल शनिवारी आपले फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट बंद केले आहे. त्या ज्यांच्यासोबत लग्न करत आहेत ते IAS प्रदीप गावंडे यांनीही सोशल मीडियावरील आपले इन्स्टाग्राम अकाउंट बंद केले आहे.




टीना दाबीचे इन्स्टाग्रामवर 1.5 मिलियन फॉलोअर्स होते. तितकेच लोक त्याच्या फेसबुक पेजशी जोडले गेले होते. अलीकडेच दाबीने मॅचमेकिंगची बाब आयएएस प्रदीप गावंडे यांच्याशी शेअर केली. त्यानेच या दोघांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यावर 1 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले होते.

आयएएस प्रदीप गावंडे यांच्या लग्नाची बातमी व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंटवरून अनेक जण त्यांचे अभिनंदन करत होते. त्याचवेळी अनेक जण त्यांना ट्रोलही करत होते. अकाऊंट बंद करण्यामागे दोघांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात असल्याचे मानले जात आहे. मात्र यासंदर्भात त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही आहे.




आयएएस गावंडे यांनीही खाते बंद केले..

दाबीशी लग्न केल्याच्या वृत्तानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आयएएस गावंडेचे इन्स्टाग्रामवरही रातोरात फॉलोअर्स वाढले होते. 24 तासांत फॉलोअर्सची संख्या 3154 वरून 28 हजारांहून अधिक झाली आहे. आता त्यांनी देखील आपले खाते बंद केले आहे.

Updated : 10 April 2022 4:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top