Home > News > 'मला न्याय मिळणार' गजानन काळे यांच्या पत्नी कृष्णकुंजवर...

'मला न्याय मिळणार' गजानन काळे यांच्या पत्नी कृष्णकुंजवर...

नवी मुंबई मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी आज कृष्णकुंज या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली आहे.

मला न्याय मिळणार  गजानन काळे यांच्या पत्नी कृष्णकुंजवर...
X

काही दिवसांपूर्वीच मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्यावर त्यांच्या पत्नीने मानसिक आणि शारिरिक शहरासह विवाह बाह्य संबंध असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. याच पार्श्वभूमीवर आज संजीवनी काळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि रिता गुप्ता यांच्यासोबत चर्चा केली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी मला 'कृष्णकुंजवर न्याय मिळेल' असे त्या म्हणाल्या.

यावेळी त्यांनी, राज ठाकरे सध्या पुण्याला आहेत. मी शर्मिला ठाकरे यांना भेटले असून त्या मला योग्य तो न्याय देतील. त्यांनी माझे सगळे म्हणणे ऐकून घेतला आहे. मला कृष्णकुंजवर न्याय मिळणार असून. माझं पत्र शर्मीलावहिनी यांना दिले असून माझी सर्व बाजू त्यांनी ऐकून घेतली व मला न्याय देण्याचे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी सांगितले

काय आहे हे प्रकरण

काही दिवसांपूर्वीच संजीवनी काळे यांनी पती गजानन काळे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी लग्नानंतर मला माझ्या जातीवरून तसेच माझ्या रंगावरून हिनवले जात असल्याचा व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप गजानन काळे यांच्यावर केला आहे. तसेच मानसिक आणि शारीरिक छळासह विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत नवी मुंबई महापालिकेचे विभाग अधिकारी, कंत्राटदार यांना धमकावून त्यांच्याकडून ते लाखो रुपये वसुली करत असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी पती काळे यांच्यावर केला आहे.

Updated : 21 Aug 2021 10:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top