Home > News > "मला भारतीय नवरा पाहिजे!" विदेशी तरुणीचा अनोखा शोध !

"मला भारतीय नवरा पाहिजे!" विदेशी तरुणीचा अनोखा शोध !

मला भारतीय नवरा पाहिजे! विदेशी तरुणीचा अनोखा शोध !
X

सोशल मिडियाच्या माध्यमातून मुलगी मुलगा किंवा आपला पार्टनर शोधणं हा एक ट्रेंडचाच विषय बनला आहे. आणि अशात आजकालचा सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड व्हायरल होईल हे सांगणं कठीण आहे. डान्स, गाणी, कला, स्टंट आणि अगदी लग्नासाठी जोडीदार शोधणारे व्हिडीओही व्हायरल होतात. सध्या एका विदेशी तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती लग्नासाठी भारतीय नवरा शोधत आहे.


डायनारा नावाची विदेशी मुलगी वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून भारताविषयी प्रेम व्यक्त करताना दिसते. ती भारतीय संस्कृती आणि परंपरांचा आदर करते आणि हिंदी भाषा शिकण्याचा प्रयत्न करते.या व्हिडिओमध्ये तुम्हाला डायनारा नावाची एक विदेशी तरुणी दिसते. ती बस स्टॉपच्या सुचना फलकवर "भारतीय नवरा शोधतेय" अशी जाहिरात लावताना दिसते. या जाहिरातीमध्ये तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटचा क्युआर कोडही आहे.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया:

dijidol या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुम्ही कोणाला शोधताय का?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी मी तयार असल्याचे लिहिलेय तर काही लोकांनी तिला नकार दिला आहे. एका तरुणीने तिचा अनुभव सांगत लिहिलेय, “मला भारतीय बॉयफ्रेंड आहे. तो खूप छान आहे” तर एका युजरने लिहिलेय, “इन्स्टाग्राम फॉलोवर्स वाढवण्यासाठी एक चांगली ट्रिक आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “फॉर्म कुठे फिल करायचा आहे?” अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत

डायनाराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. काही लोकांना तिची कल्पना आवडली आहे तर काही लोकांना ती फक्त प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं वाटत आहे.



Updated : 10 April 2024 1:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top