Home > News > "आई तुझी आठवण येत आहे.." अभिनेता संजय दत्तची भावनिक पोस्ट..

"आई तुझी आठवण येत आहे.." अभिनेता संजय दत्तची भावनिक पोस्ट..

एकही क्षण असा जात नाही जेव्हा मी तुझी आठवण काढत नाही. असं म्हणत संजय दत्त यांनी आई नर्गिस दत्त यांचे काही फोटो शेअर करत ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे.

आई तुझी आठवण येत आहे.. अभिनेता संजय दत्तची भावनिक पोस्ट..
X

ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री नर्गिस दत्त यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने संजय दत्तने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आई नर्गिस यांची आठवण काढली आहे. याशिवाय संजय दत्तने पोस्टमध्ये त्याच्या आईच्या काही थ्रोबॅक फोटोंचा कोलाजही शेअर केला आहे.

एकही क्षण असा जात नाही जेव्हा मला तुझी आठवण येत नाही

संजय दत्तने कोलाज शेअर करत लिहिले आहे की, "एकही क्षण असा जात नाही जेव्हा मी तुझी आठवण काढत नाही. आई, तू माझ्या जीवनाचा आधार आणि माझ्या आत्म्याची शक्ती होतीस. तू माझ्या बायको व मुलांना भेटायला हवं होतं अशी माझी इच्छा होती तू त्यांना भेटली असती त्यांना प्रेम आणि आशीर्वाद दिले असते. मला दररोज तुझी आठवण येते."

1981 मध्ये नर्गिस यांचे निधन झाले

कर्करोगाशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर वयाच्या ५१ व्या वर्षी ३ मे १९८१ रोजी नर्गिस यांचे निधन झाले. संजय दत्तचा रॉकी हा डेब्यू चित्रपट रिलीज होण्याच्या तीन दिवस आधी त्याचे निधन झाले होते.

Updated : 4 May 2022 1:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top