Home > News > "माझा आणि वटपौर्णिमेचा काहीही संबंध नाही.." रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केली परखड भूमिका

"माझा आणि वटपौर्णिमेचा काहीही संबंध नाही.." रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केली परखड भूमिका

माझा आणि वटपौर्णिमेचा काहीही संबंध नाही.. रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केली परखड भूमिका
X

वटपौर्णिमेनिमित्त अनेक महिला वडाला फेर्‍या मारून पुढचे सात जन्म हाच पती मिळूदे अशी प्रार्थना करतात. पण या सगळ्याविषयी ''माझा आणि वटपौर्णिमेचा फारसा संबंध येत नाही. लग्न झाल्यापासून मी एकदाही वडाच्या झाडाला फेरे मारलेले नाहीत. हे करण्यासाठी माझ्या सासरच्या मंडळींनी देखील मला कधीही आग्रह केला नाही किंवा माझ्या नवऱ्याने सुद्धा कधीही तसा हट्ट केला नाही'' असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

हेरवाड गावाने घेतलेल्या विधवा प्रता बंदी निर्णयाच्या धर्तीवर खडकवासला, धायरीसह एकूण 29 ग्रामपंचायतींनी विधवा प्रता बंदी करणारा ठराव मंजूर केला. यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात रुपाली चाकणकर बोलत होत्या. यावेळी त्यांनी राज्यातील प्रत्येक गावाने विधवा प्रथा मुक्तीचा ठराव करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन करत वटपौर्णिमेनिमित्त हाच पती सात जन्म मिळूदे म्हणून पूजा करण्य़ाच्या या प्रथेविषयी देखील आपले परखड मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या झाडाला फेऱ्या मारण्या ऐवजी वडाच्या झाडातून ऑक्सिजन जास्त मिळतो त्यामुळे वडाचे झाड लावा. ज्यांनी माझ्याकडे दोन दिवस आधी, नवरा दारू पिऊन मारहाण करतो अशी तक्रार केलेली असते त्याच महिला वटपौर्णिमेला वडाची पूजा करताना दिसतात. त्या पूजा करतात कारण त्यांना समाज काय म्हणेल या भीती असते तर अनेक महिला आपल्याकडील नवीन साड्या घालण्याची संधी मिळते म्हणून वडाच्या झाडाला फेर्‍या मारताना दिसतात. असं म्हणत त्यांनी आपल्या समाजाला सत्यवानाची सावित्री फार लवकर समजली परंतु जोतिबांची सावित्री अजून समजली नाही अशी खंत व्यक्त केली.



Updated : 14 Jun 2022 5:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top