"मी जिवंत आहे", निधनाच्या वृत्तावर किशोरी पेडणेकरांच ट्वीट
Team | 19 July 2021 5:36 AM GMT
X
X
मबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांनतर त्यांच्या निधनाच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. तर काही माध्यमांनी खात्री न करताच बातम्या सुद्धा प्रसारित केल्या. यावर खुद्द पेडणेकर यांनी ट्वीट करत खुलासा केला असून, 'मी जिवंत आहे' असं म्हंटलं आहे. पेडणेकर यांनी ट्वीट करत म्हंटल आहे की, "मी जिवंत आहे आणि माझ्यावर ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. थोड्याच वेळापूर्वी मी डाळ-खिचडीही खाल्ली. अशी बातमी छापणे दुर्दैवी आहे. बातमी देण्यापूर्वी ती बातमी खरी की खोटी याबाबत एकदा शहनिशा करा", असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी लिहीलं आहे.
किशोरी पेडणेकर यांना शनिवारच्या रात्रीपासून (१७ जुलै) छातीत त्रास होत होता. तर सकाळी त्रास अधिक वाढल्यानं त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महापौर कार्यालयाने याबाबतची माहिती दिली आहे. तसेच त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती शिवसेना नेत्यांकडून देण्यात आली आहे.
Updated : 2021-07-19T11:09:27+05:30
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire