Home > News > संतापजनक! चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीचं गुप्तांग सुई दोऱ्याने शिवलं

संतापजनक! चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीचं गुप्तांग सुई दोऱ्याने शिवलं

संतापजनक! चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीचं गुप्तांग सुई दोऱ्याने शिवलं
X

देशातील महिला अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाही. त्यात महिलांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. अशीच काही मनाला चटका देणारी घटना मध्यप्रदेशमध्ये समोर आली आहे. मी सोडून अजून कुणाशी अनैतिक संबंध आहेत, तेव्हा असे संबंध आपल्या पत्नीला ठेवता येऊ नये म्हणून पतीने थेट आपल्या पत्नीचे गुप्तांग सुई दोऱ्याने शिवल्याची संतापजनक प्रकार समोर आला आहे.

मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातून किळसवाणा प्रकार समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 57 वर्षीय व्यक्तीने सुई आणि धाग्याने पत्नीचा प्रायव्हेट पार्ट शिवल्याची संतापजनक प्रकार समोर आला आहे. पती व्यवसायाने डॉक्टर आहे. तर या घटनेनंतर पोलिसांकडून आरोपीला आरोपीला अटक करण्यात आली आहे.

आरोपी हा नेहमी तिच्या पत्नीशी वाद घालत असे कारण, त्याला संशय होता की, गावातील एका पुरुषाशी आपल्या पत्नीचे अवैध संबंध आहेत. त्यामुळे तो पीडिताला नेहमी मारहाणही करायचा. अलीकडेच पुन्हा याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला. सुरवातील आरोपीने आपल्या पत्नीला मारहाण केली आणि नंतर तिचा प्रायव्हेट पार्ट सुई आणि धाग्याने शिवला.

पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून,आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर पीडित महिला जखमी झाली असून,तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र या घटनेनंतर परिसरात आरोपी पतीविरोधात लोकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.

Updated : 1 Sep 2021 7:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top