Home > News > माझ्या मृत्यू पश्चात पत्नीचे कुंकू पुसू नका, पतीचं प्रतिज्ञापत्र

माझ्या मृत्यू पश्चात पत्नीचे कुंकू पुसू नका, पतीचं प्रतिज्ञापत्र

आपल्या मृत्यूच्या पश्चात पत्नीला कुंकू पुसायला लागू नये म्हणून या पठ्ठ्याने थेट प्रतिज्ञापत्रच तयार केलंय.

माझ्या मृत्यू पश्चात पत्नीचे कुंकू पुसू नका, पतीचं प्रतिज्ञापत्र
X

अनिष्ट प्रथांमुळे विधवांना उर्वरित आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागतो. ती वेळ आपल्या पत्नीवर येऊ नये म्हणून करमाळा तालुक्यातील पोथरे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांनी पारंपारिक अनिष्ट रूढींच्या सर्व बंधनातून पत्नीला मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत तहसीलदारांना शंभर रुपयांच्या बाँडवर आपल्या मृत्युपश्चात पत्नीवर अनिष्ट रूढी परंपरा लादू नये असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.नवरा मरण पावल्यानंतर विधवा महिलेचे कुंकू पुसले जाते. बांगड्या फोडल्या जातात काही ठिकाणी अलंकार काढून घेतले जातात.सणावाराला विधवा महिलेला समाजात कोणत्याही कार्यक्रमात मान दिला जात नाही.अशा अनेक अनिष्ट रूढी परंपरा प्रथा आजही आपल्या समाजात आहेत. जग बदलत असले तरी महिलांवर होणारे अन्याय,अत्याचार कमी झालेले नाहीत.त्यामुळे अशा प्रथांना थारा न देता आपण हा निर्णय घेतल्याचे प्रमोद झिंजाडे यांनी जाहीर केले.

हा निर्णय घ्यावा असं त्यांना का वाटलं? तर संस्थेतील एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्यात मृत्यू झाला. त्यावेळी मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं नवरा गेल्याचे एवढं मोठं दुःख असताना त्यावेळी त्या महिलेचे दागिने काढणे, कुंकू पुसणे, तिचे मंगळसुत्र काढण्यात बाकीच्या महिला प्रयत्न करत होत्या. मात्र ही महिला यासाठी विरोध करत होती. माझ्या शरीरावरचे दागिने, मंगळसूत्र, माझं कुंकू पुसू नाका असं म्हणत होती. मात्र दुसऱ्या विधवा महिलांचं त्या महिलेला विद्रुप करण्यासाठी प्रयत्न करत होत्या. हे पाहिल्यानंतर खूप वेदना झाल्या आणि त्यानंतर मग आपलं काही बरं वाईट झालं तर माझ्या पत्नीवर ही वेळ येऊ न देण्याचा निर्णय प्रमोद झिझाडे यांनी घेतला.

64 वर्षीय प्रमोद शेंडे यांनी लग्नाच्या 44 वर्षानंतर आपल्या सुखी संसारातून भावी काळात आपल्या नंतर पत्नीला समाजाकडून रुढी-परंपरांचा होणारा त्रास टाळण्यासाठी पत्नी अलका हिला जुन्या रूढी व परंपरा येथून पूर्ण मुक्त केले आहेत त्यांना दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे सर्व मुले उच्चशिक्षित असून सर्वांचे लग्न झाली असून ती नोकरीसाठी बाहेर गावे असतात दरम्यान झिंजाडे यांच्या निर्णयानंतर त्यांच्या अनेकांनी कौतुक केले आहे. तसेच समाजातील इतर व्यक्तींना देखील अशाच प्रकारचा पुढाकार घ्यायला हवा असेही अनेकांनी म्हटले आहे. अशा उपक्रम भविष्यात विधवा महिलांना सन्मान मिळवून देईल असेही यावेळी प्रमोद झिंजाडे यांनी सांगितले आहे

Updated : 1 April 2022 8:02 AM GMT
Next Story
Share it
Top