Home > News > देशात कोरोना 24 तासात कोरोनाचे 90 हजार नवे रूग्ण

देशात कोरोना 24 तासात कोरोनाचे 90 हजार नवे रूग्ण

देशात कोरोना 24 तासात कोरोनाचे 90 हजार नवे रूग्ण
X

दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच गेल्या 24 तासात कोरोना रूग्णांच्या संख्येचा स्फोट झाला आहे. गेल्या 24 तासात 90 हजार 928 नवे रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी 58 हजार 97 कोरोना रूग्णांची नोंद झाली होती. त्या तुलनेत गुरूवारी तब्बल ५५ टक्क्यांनी रुग्णांचा संख्या वाढली आहे. त्यामुळे देशाच्या चिंतेत वाढ त आहे. देशात गेल्या २४ तासात 335 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १९ हजार 206 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 10 जूननंतर पहिल्यांदाच कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येत देशात एवढी मोठी वाढ झाली आहे.

गेल्या 24 तासात राज्यात 26 हजार 538 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तसेच 5 हजार 331 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याबरोबरच राज्यातील रूग्ण कोरोनामुक्त होण्याचा दर 96.55 टक्क्यांवर पोहचला आहे. 24 तासात राज्यात 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 144 ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या वाढली आहे.

राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णांपैकी सर्वाधिक १०० रुग्ण मुंबईत आहेत, तर नागपूर 11, ठाणे आणि पुण्यात 7,पिंपरी चिंचवड 6, कोल्हापुर 5, अमरावती,उल्हासनगर आणि भिवंडी निजामपूर महापालिका 2 यासह पनवेल आणि उस्मानाबाद येथे प्रत्येकी एका रूग्णाची नोंद झाली आहे. तर राज्यात एकूण ओमायक्रॉनबाधीत रूग्णांची संख्या 797 इतकी झाली आहे.

Updated : 6 Jan 2022 6:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top