Home > News > कोरोनाची लाट कधी पर्यंत संपुष्टात येईल? आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

कोरोनाची लाट कधी पर्यंत संपुष्टात येईल? आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

कोरोनाची लाट कधी पर्यंत संपुष्टात येईल? आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती
X

न्यूकॉन हा नवा व्हेरीएंट कोरोनचा पुढे येत आहे. याबाबतच्या प्राथमिक माहितीनुसार आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. परंतु तज्ञांच्या मतानुसार मार्चच्या मध्यावधीपर्यंत कोरोनाची लाट संपुष्टात येऊ शकते. अशी दिलासादायक माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पंढरपूरात दिली.

न्यूकॉन हा नवा व्हेरीएंट चीन मधून आला आहे. याबाबतची जागतिक आरोग्य संघटनाकडून अद्याप माहिती नाही. मात्र या नव्या विषाणूमध्ये मृत्यूदर अधिक आहे. पण, सध्या या नव्या विषाणूचा कुठलाही रूग्ण आपल्या देशात नाही. त्यामुळे सध्या कुठलीही चिंता नाही. तसेच मास्कनुकती सध्या राज्यात नाही. सध्या संसर्गाचे प्रमाण कमी आले आहे. त्यामुळे तज्ञांच्या मतानुसार मार्च महिन्याच्या मध्यावधी पर्यंत कोरोना संपुष्टात येऊ शकतो. तरीही नागरीकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. असे आवाहन यावेळी आरोग्यमंत्री टोपे यांनी कले. टोपे यांनी यावेळी विठ्ठल दर्शन घेतले.

Updated : 30 Jan 2022 4:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top