Home > News > महिला बचत गट रोजगार कसा निर्माण करतात?

महिला बचत गट रोजगार कसा निर्माण करतात?

महिलांचा आधार, महिलांचा विश्वास म्हणजे बचत गट

महिला बचत गट रोजगार कसा निर्माण करतात?
X

महिलांच्या दृष्टीने त्यांना रोजगाराच्या संधी मिळणं फार महत्वाचं असतं. त्या संधी या महिलांना गावातील बचतगट देत असतं पण महिलांनी महिलांसाठी सुरू केलेले, महिलांनी चालवलेले बटत गट रोजगाराची निर्मिती करतात तरी कशी हे एका उदाहरणातून पाहूयात.


पावसाळा लागण्याच्या आधी उन्हाळ्यात परीक्षा संपल्यानंतर शहरी भागात व ग्रामीण भागात महिला एकत्र येऊन विविध वाळवणाचे पदार्थ बनविण्यात मग्न असायच्या. त्यात सर्व महिला एकत्र येऊन गप्पा मारत विनोद करत, या सगळ्यात महिलांचा वेळ कुठे सरायचा हे समजत नव्हतं परंतु सध्या वाळवणाचं स्वरूप बदललं आहे. पूर्वीसारखं महिला एकत्र येऊन पापड , शेवाळे, कुरडया, वेफर्स हे पदार्थ आता बनविताना दिसत नाहीत. आपल्याला वर्षभर साठवण्यासाठी लागेल अश्या पदार्थांचे उत्पादन बचत गटाच्या महिलांकडून बनवून घेण्याची पद्धत आता मोठ्या प्रमाणात वापरली आहे. त्यामुळे बचत गटाच्या महिलाना ही रोजगाराची संधी उपलब्ध होताना दिसतायत वाळवणाचे पदार्थ शहरी भागात कालबाह्य सारखेच झाले आहे.

ग्रामीण भागात अजूनही हे पदार्थ महिला एकत्र येऊन बनविताना दिसतात. चोपड्यातील सर्वज्ञ महिला बचत गटामध्ये जवळपास दहा ते बारा महिला वाळवणाचे पदार्थ हसत खेळत बनविताना दिसतात. महिलांना ज्याप्रमाणे ज्या वस्तू व पदार्थ हव असतं त्याप्रमाणे या बचत गटातील महिला त्यांना तो पदार्थ बनवून देत असतात. दीपावलीला फराळ देखील बनवून देत असतात. या सर्वज्ञ महिला बचत गटाला हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आला असल्याचे या महिलांनी सांगितले. सर्वज्ञ महिला बचत गटातील महिला पुष्पा उमेश बडगुजर अध्यक्ष सविता महेंद् बडगुजर, सुरेखा बडगुजर सचिन रेखा संदीप बडगुजर स्वाती मिलिंद बडगुजार उपस्थित होते.

Updated : 20 April 2022 11:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top