Home > News > हॉटेल्स,दुकाने रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी; मात्र...

हॉटेल्स,दुकाने रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी; मात्र...

हॉटेल्स,दुकाने रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी; मात्र...
X

राज्यातील कोरोना परिस्थितीमध्ये होत असलेली सुधारणा पाहता राज्य सरकारकडून कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता करण्याचा निर्णय घेत आहे. सुरवातीला शाळा,कॉलेज सुरु करण्याच्या निर्णयानंतर आता मुंबईत दुकानं तसेच हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. याविषयीची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. तर इतर जिल्ह्यातील दुकाने तसेच हॉटेल्संदर्भात स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. याच निर्णयांतर्गत आता मुंबईतील हॉटेल्स तसेच दुकाने रात्री बारा वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच रात्री एक वाजेपर्यंत हॉटेल्सना शेवटची ऑर्डर घेता येईल असादेखील निर्णय घेण्यात आला आहे.

अन्य जिल्ह्यांसाठी स्थानिक अधिकाऱ्यांना अधिकार

मुंबईत हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली असली तरीही इतर जिल्ह्यांना मात्र हे नियम लागू नाहीत. कारण अन्य जिल्ह्यात दुकाने तसेच हॉटेल्संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला दिला गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आणि परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासन ह्या बाबत निर्णय घेणार आहे.

Updated : 19 Oct 2021 3:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top