Latest News
Home > News > धक्कादायक: प्रेमविवाह केला म्हणून आई आणि भावाने मिऴून मुलीचे धडावेगळं केलं शिर आणि…

धक्कादायक: प्रेमविवाह केला म्हणून आई आणि भावाने मिऴून मुलीचे धडावेगळं केलं शिर आणि…

धक्कादायक: प्रेमविवाह केला म्हणून आई आणि भावाने मिऴून मुलीचे धडावेगळं केलं शिर आणि…
X

औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ऑनर किलिंगची भीषण घटना घडली आहे. वैजापूर तालुक्यातील गोयगाव येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमविवाह केलेल्या बहिणीवर कोयत्यानं वार करत सख्या अल्पवयीन भावानं तिचं शीर धडावेगळं केले आहे. या हतयेनंतर आई आणि मुलगा वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना शरण आले आहेत. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कीर्ती मोटे हिने अविनाश थोरे यांच्याशी 21 जून रोजी आळंदी येथे प्रेम विवाह केला होता. मात्र त्यांच्या या विवाहाला किर्तीच्या घरच्यांचा नकार होता. पण काही काळानंतर बहीण आणि तिचा प्रियकर विवाह करुन घरी परतले तेव्हा तिच्या लहान अल्पवयीन भावाला याचा प्रचंड राग आला होता. त्यामुळं त्यानं रागाच्या भरात त्याने धारदार कोयत्यानं बहिणीवर वार केले आणि तिचं शीर धडावेगळं केलं. सध्या आई आणि मुलगा दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.

Updated : 6 Dec 2021 6:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top