Latest News
Home > News > महिला डीसीपीला फुकटची बिर्याणी खाण्याचा अट्टाहास महागात; गृहमंत्र्यांनी दिले चौकशी करण्याचे आदेश

महिला डीसीपीला फुकटची बिर्याणी खाण्याचा अट्टाहास महागात; गृहमंत्र्यांनी दिले चौकशी करण्याचे आदेश

महिला डीसीपीला फुकटची बिर्याणी खाण्याचा अट्टाहास महागात; गृहमंत्र्यांनी दिले चौकशी करण्याचे आदेश
X

जवळपास 5 मिनिटाची एक ऑडिओ क्लिप कालपासून सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. ज्यात त्या आपल्या एका कर्मचाऱ्याला मटण बिर्याणीची फर्माईशीची करतायत. तसेच एसपी हॉटेलची बिर्याणी हवी आहे असाही त्या अट्टाहास करतायत. तसेच या डीसीपी मॅडम फक्त ऑर्डर देऊन थांबल्या नाहीत. तर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे? असा सवालही केलाय. त्यांची फुकटची बिर्याणीवाली क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता थेट गृहमंत्र्यांनी याची दखल घेतली असून, ऑडिओ क्लिपच्या चौकशीचे आदेश दिले आहे. नेमकं काय म्हणाल्यात डीसीपी मॅडम, ऑडिओ क्लिप तुम्हीच ऐका....

ज्याप्रमाणे दावा केला जात आहे, त्याप्रमाणे अजूनही अधिकृतपणे ही क्लिप खरी आहे की खोटी याचा खुलासा होऊ शकला नाही. त्यामुळे max woman सुद्धा ह्या क्लिप बाबत केल्या जाणाऱ्या दाव्याशी सहमत नाही.

Updated : 2021-07-30T19:31:51+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top