Home > News > ज्येष्ठ कसरतपटू शांताबाई पवार यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मदतीचा हात...

ज्येष्ठ कसरतपटू शांताबाई पवार यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मदतीचा हात...

ज्येष्ठ कसरतपटू शांताबाई पवार यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मदतीचा हात...
X

शांताबाई पवार यांना मदत करण्यासाठी गृहमंत्री पोहोचले थेट शांताबाईच्या घरी... कोण आहेत या शांताबाई पवार वाचा...

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते ज्येष्ठ कसरतपटू शांताबाई पवार (वय वर्ष 85) यांना 1 लक्ष रुपये तसेच साडी-चोळी देवून गौरव करण्यात आला. पुण्यात त्यांच्या निवासस्थानी जाऊन गृहमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला. यावेळी आमदार चेतन तुपे यांची प्रमुख उपस्थिती होती.

'आजी या वयातही परिवार चालविण्यासाठी काम करतात. त्यांना शासकीय योजनेतून योग्य ती मदत दिली जाईल. असं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी दिलं.

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या ‘भरोसा सेल’ मार्फत ज्येष्ठ नागरिकांना मदत केली जाते, आतापर्यंत 15 हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारे मदत करण्यात आली आहे. पोलीस विभागामार्फत अधिकाधिक मदत देण्याचाही प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगून जिल्ह्यातील गणेशोत्सव तसेच बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस विभागाचा आढावा घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी शांताबाई पवार यांनी कसरतीचे काही प्रकार करुन आपण या वयातही आरोग्यसंपन्न असल्याचे दाखवून दिले.

Updated : 26 July 2020 5:29 AM IST
Next Story
Share it
Top