Home > News > Omicron : चिंता वाढली, देशात १२८ रूग्णांना ओमायक्रॉनची बाधा

Omicron : चिंता वाढली, देशात १२८ रूग्णांना ओमायक्रॉनची बाधा

Omicron :  चिंता वाढली,  देशात १२८ रूग्णांना ओमायक्रॉनची बाधा
X

जगभर कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनने थैमान घातले आहे. त्यातच देशात कोरोनाच्या तिसरी लाट येणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. या पार्श्वभुमीवर गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या 9 हजार 195 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. यापैकी १२८ रुग्ण ओमायक्रॉनची बाधा असलेले आढळले आहे. त्यामुळे आता देशातील ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 781 आहे.

तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन अनेक राज्यांनी निर्बंध लावण्यास सुरूवात केली आहे. ओमायक्रॉनच्या देशातील एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक 238 रुग्ण दिल्लीमध्ये आढळून आले आहेत. तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, सध्या राज्यात ओमायक्रॉनचे 167 रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात गेल्या २४ तासात कोरोनाचे 2 हजार 172 रुग्ण आढळून आले आहेत. तर सध्या 11 हजार 492 रुग्ण उपचार घेत आहेत.

तिसऱ्य़ा लाटेच्या पार्श्वभुमीवर देशात 143 कोटी 7 लाख 92 हजार 357 नागरीकांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी 83 कोटी 87 लाख 31 हजार 577 नागरिकांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे. तर 59 कोटी 10 लाख 60 हजार 780 नागरिकांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

दरम्यान गंभीर आजार असणाऱ्या 60 वर्षावरील नागरिकांना कोरोना लसीची तिसरी मात्रा घेण्यासाठी डॉक्टरांच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. तर मंगळवारी औषध नियामक मंडळाने molnupiravir या गोळीला जगातील पहिली आपत्कालिन वापरासाठी मंजुरी दिली आहे. तसेच बायोलॉजिकल ई. या कंपनीने विकसीत केलेली Carbovax आणि सीरम इन्स्टीट्यूटने विकसीत केलेल्या Covovax याबरोबरच अमेरीकन बायोटेक्नोलॉजी निर्मित Novavax या लसींच्या आपत्कालीन वापराला भारतीय औषध नियामक मंडळाने मंजुरी दिली आहे. कोरोना आणि ओमिक्रॉन रूग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभुमीवर राज्यांमधील निर्बंध कडक करण्यात आले आहेत.

Updated : 29 Dec 2021 6:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top