Home > News > महिला डॉक्टर्सच्या बाथरुम, बेडरुममध्ये छुपे कॅमेरे; पुण्यातील धक्कादायक प्रकार

महिला डॉक्टर्सच्या बाथरुम, बेडरुममध्ये छुपे कॅमेरे; पुण्यातील धक्कादायक प्रकार

महिला डॉक्टर्सच्या बाथरुम, बेडरुममध्ये छुपे कॅमेरे; पुण्यातील धक्कादायक प्रकार
X

courtesy social media

शिक्षणाच माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या भारती विद्यापीठात महिला डॉक्टर्सच्या रूममध्ये चक्क स्पायकॅम सापडलेत. बेडरूम तसंच बाथरूममध्ये कॅमेरे सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका 31 वर्षीय महिला डॉक्टरनं याबाबत पोलिसात तक्रार दिली असून, पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

विद्यापीठात अनेक महिला डॉक्टर राहतात, त्यामुळे अशाप्रकारे छुपे कॅमेरे लावण्या मागचा हेतू काय आहे, आणि हा प्रकार कुणी केला याचा शोध पोलिसांनी घेण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया स्थानिक डॉक्टरांनी दिली आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाच्या बाहेर सुद्धा सीसीटीव्ही नसताना, क्वार्टर्सच्या आत छुपे कॅमेरे लावण्या मागचा हेतू काय असेल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

क्वार्टर्समध्ये रहाणाऱ्या एक डॉक्टरमहिला घरी आल्यावर तिने बाथरुममधील बल्ब लावला पण तो लागत नव्हता, अनेक प्रयत्न करूनही बल्बही काही लागेना म्हणून, या डॉक्टरने इलेक्ट्रीशियनला बोलवलं. इलेक्ट्रीशियनने बल्ब काढून हातात घेताच त्याला धक्का बसला. कारण ह्या बल्बमध्ये छुपा कॅमेरा आहे, असाच छुपा कॅमेरा बेडरुममध्येही दिसून आला.

Updated : 9 July 2021 5:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top