Home > News > 'जुने तेच सोने ' Her circle चा महिलांसाठीचा खास उपक्रम

'जुने तेच सोने ' Her circle चा महिलांसाठीचा खास उपक्रम

जुने तेच सोने  Her circle चा महिलांसाठीचा खास उपक्रम
X

Her Circle या नीता अंबानींच्या नवीन उपक्रमातून महिलांना एक नवा उत्साह मिळणार आहे. Her Circle च्या माध्यमातून जुन्या गोष्टी पुन्हा नव्याने वापरता येणार आहेत . कश्या ? यासाठी पूर्ण लेख वाचा ...

या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक-अध्यक्षा नीत अंबानी यांनी द हर सर्कल, एव्हरीबॉडी प्रोजेक्ट लाँच केला आहे. . महिलांसाठी एक सुरक्षित, सर्वसमावेशक, डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. हर सर्कलच्या माध्यमातून महिलांसाठी एक नवीन स्टॉप सामग्री आणि सोशल नेटवर्किंग ठिकाण उपलब्ध होणार आहे . याच्यामध्ये पर्यावरण प्रेमी असणाऱ्यांसाठी सुद्धा चांगलाच संदेश मिळणार आहे.

'Use minimum for maximum effect' हा उद्देश Her Circle च्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे. यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री कल्कीने हर सर्कलचा कव्हर शूट केला आहे . यामध्ये पारंपारिक रित्या आपल्या घरातील अनेक स्त्रिया जुन्या गोष्टी टाकून न देता त्याचा पुन्हा वापर करतात आणि हा वापर कलाकुसरीने करताना दिसतात . जसं की जुन्या कपड्यांच्या उश्या , त्याचबरोबर जुन्या साड्यांचे ड्रेस,पायपुसणी,वॉलपीस अशाप्रकारे पुनर्चक्रीकरण करून अनेक वस्त्रे आपल्या घरातील स्त्रिया पुन्हा वापरतात आणि याचा खरंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट करण्यासाठी वापर होत आहे .

याच प्रकारे नीता अंबानी यांच्या हर सर्कल या उपक्रमातील अनेक महिलांना नवीन ऊर्जा मिळणार आहे . "सस्टेनेबिलिटी हे आपलं भविष्य आहे ,जर आपल्याला या ग्रहावर सुरक्षित राहायचे असेल तर सस्टेनेबल राहण्याइतकं फॅशनेबल काही नाही "असं कल्कीने सांगितले आहे . कपड्यांपासून अनेक प्रकारच्या घरी Refurbrished सस्टेनेबल ज्वेलरी सुद्धा तयार केल्या आहेत.

Updated : 13 Jun 2023 12:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top