Home > News > ‘बाहेर पड म्हणत चॅलेंज करणाऱ्यांनो हे पाहा! आहे का सुरक्षीत!’ हेमांगी कवीचा संताप

‘बाहेर पड म्हणत चॅलेंज करणाऱ्यांनो हे पाहा! आहे का सुरक्षीत!’ हेमांगी कवीचा संताप

‘बाहेर पड म्हणत चॅलेंज करणाऱ्यांनो हे पाहा! आहे का सुरक्षीत!’ हेमांगी कवीचा संताप
X

प्रियांका गांधी आणि राहुल गांधी हाथरसला रवाना होत असताना डीएनडीवर गोळा झालेले काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. त्यावेळी प्रियांका गांधी यांना रोखण्यासाठी महिला पोलिसांऐवजी पुरूष पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रावरुन समाजमाध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली.

या प्रकरणावरुन अभिनेत्री हेमांगी कवी यांनी ‘हा ही बलात्काराएव्हढाच मोठा गुन्हा आहे!’ असं म्हणून आपला संताप व्यक्त केला आहे.

'नुसतं सोशल मीडियावर येऊन बोलू नका मॅडम, बाहेर पड, म्हणाऱ्यांनो आणि चॅलेंज करणाऱ्यांनो हे पाहा!आहे का सुरक्षीत! कसे वाटतायेत ते हात तिच्यावर? हा ही बलात्काराएव्हढाच मोठा गुन्हा आहे.मूळ समस्या कुठेय कळतंय का?', असा प्रश्न विचारत तिनं संताप व्यक्त केलाय.

Updated : 5 Oct 2020 5:36 PM IST
Next Story
Share it
Top