Home > News > औरंगाबाद जिल्ह्यात पावसाचा कहर;कोरडगाव तलाव फुटला

औरंगाबाद जिल्ह्यात पावसाचा कहर;कोरडगाव तलाव फुटला

औरंगाबाद जिल्ह्यात पावसाचा कहर;कोरडगाव तलाव फुटला
X

काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाला आहे. तर ग्रामीण भागातील पाझर तलाव, छोटी-मोठी धरणे तुडूंब भरली आहेत. तर वैजापूर तालुक्यातील कोरडगाव येथील पाझर तलाव फुटला असल्याने परिसरातील गावात धोका निर्माण झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर पैठण कन्नडसह सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या सर्वच नद्यांना पूर आला आहे.तर तलाव सुद्धा तुडुंब भरली आहे. वैजापूर तालुक्यातील कोरडगाव येथील पाझर तलाव फुटल्याने अनेक गावांना धोका निर्माण झालं असून, नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे.

हर्सूल तलाव भरलं...

औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणारं हर्सूल तलाव पूर्णपणे भरलं असून, वरून पाणी वाहत आहे. तर हर्सूलपासून जतवाड्याला जाणारं पूल वाहून गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून,नागरिकांना जाण्यास बंदी करण्यात आली आहे.

Updated : 28 Sep 2021 11:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top