Home > News > हँडल न पकडता डोक्यावर भारा घेऊन सायकल चालवणाऱ्या वक्तीची आनंद महिंद्रानी घेतली दखल म्हणाले...

हँडल न पकडता डोक्यावर भारा घेऊन सायकल चालवणाऱ्या वक्तीची आनंद महिंद्रानी घेतली दखल म्हणाले...

''लोकांना ओळखणे आणि त्यांना प्रशिक्षण देणे हे सोपे काम नाही'' व्हायरल व्हिडिओवर आनंद महिंद्रांचे ट्विट

हँडल न पकडता डोक्यावर भारा घेऊन सायकल चालवणाऱ्या वक्तीची आनंद महिंद्रानी घेतली दखल म्हणाले...
X

कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल सांगता येत नाही. भारतात टॅलेंट आणि वेगवेगळ्या प्रयोगाची काही कमतरता नाही. कधी कोण काय करेल आणि त्याची चर्चा जगभर होईल हे काही सांगता येत नाही. आता मागच्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ समाज माध्यमांवर जोरात व्हायरल होत आहे. काय आहे हा व्हिडीओ? तर एक तरुण सायकलवरून गवताचा भारा घेऊन जात आहे. आता तुम्ही म्हणाल यात व्हायरल होण्यासारखं काय? खरी गोष्ट अशी आहे की ह्या तरुणाने डोक्यावरती भरा घेतला आहे आणि दोन्ही हात त्याने त्या भाऱ्याला लावले आहेत आणि तो एकदम सुसाट आपला तोल सावरत सायकल चालवत आहे. आता तुम्ही म्हणाल हात न पकडता सायकल कशी काय चालवायची तर मग हा व्हिडिओ बघा..आता या व्हिडीओची चर्चा फक्त समाज माध्यमांवरचं नाही तर मोठमोठ्या व्यक्तींनी सुद्धा याची दखल घेतली आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा त्यांनी देखील एक ट्विट करत हा व्हिडिओ शेअर केला आहे. आणि हा व्हिडिओ शेअर कर त्यांनी म्हटले आहे, एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्या व्हिडिओ मध्ये एक युवक डोक्यावर भारा घेऊन सायकल चालवत आहे. कमालीची गोष्ट ही आहे की तो अत्यंत वेगाने ही सायकल चालवत आहे. या युवकाचे दोन्ही हात सायकलच्या हँडलवर ती नाहीत. या व्यक्तीचा समतोल किती छान आहे पण खेदाची गोष्ट ही आहे की, या व्यक्ती सारखे प्रतिभावान जिम्नॅस्ट खेळाडू बनू शकणारे आणखी बरेच लोक देशात असतील परंतु अशा लोकांना ओळखणे आणि त्यांना प्रशिक्षण देणे हे सोपे काम नाही. असं म्हणत त्यांनी या व्हिडिओमध्ये सायकल चालवणाऱ्या व्यक्तीची कौतुक केला आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा हे नेहमीच ह्या वेगवेगळ्या व्हायरल झालेल्या टॅलेंटची दखल घेत असतात. त्याचप्रमाणे त्यांनी या व्हिडिओमध्ये व्हायरल होत असलेल्या या व्यक्तीची दखल घेत हे ट्विट केला आहे.

Updated : 30 March 2022 7:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top