Home > News > 'पारधी म्हणजे चोरटा' या आरोपाला कंटाळून त्याने घरावर बसवले कॅमेरे..

'पारधी म्हणजे चोरटा' या आरोपाला कंटाळून त्याने घरावर बसवले कॅमेरे..

पारधी म्हणजे चोरटा या आरोपाला कंटाळून त्याने घरावर बसवले कॅमेरे..
X

गुन्हेगाराला जात नसते असं म्हटलं जातं, मात्र समाजात अशी एक जात आहे. ज्यांच्याकडे नेहमीच संशयाच्या नजरेनं पाहिलं जातं. हाच संशयाचा डाग पुसून टाकण्यासाठी पारधी समाजातील एका तरुणानं समाजात सन्मानान जगता यावं, म्हणून एक शक्कल लढवलीये.

चारही बाजूने ओसाड डोंगर आणि त्यामध्ये एका पारधी कुटुंबाचं घर आहे. गावात अथवा परिसरात एखादी गुन्हेगारी घटना घडली की सर्वात आधी याच कुटुंबाला लक्ष केले जातं. गावकऱ्यांची सतत शंकेची सुई या कुटूंबावर फिरत असते. याच मानसिक त्रासाला कंटाळून आपण त्या गुन्ह्यात सहभागी नसून निर्दोष आहोत असं सिद्ध करण्यासाठी या कुटुंबातील शामल काळे या मुलाने घराच्या चारही बाजूने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले आहेत.

हे काळे कुटुंब थोडीफार असलेली शेती कसून आपला उदरनिर्वाह करत. तर शामल हा शिरूर इथल्या एका शाळेत दहावीच शिक्षण घेत आहे. त्याची शिक्षणाची मोठी जिद्द, चांगलं शिक्षण घेऊन मोठा अधिकारी बनण्याचं स्वप्न तो उराशी बाळगून आहे. मात्र वारंवार ज्या गुन्ह्यात सहभाग नाही. त्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने हे कुटुंब पुरते हतबल झाले आहे.

एखाद्या पारधी समाजाच्या घरावर बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे ही राज्यातील पहिलीच घटना म्हणावी लागेल. आम्हाला देखील समाजात इतरांप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आमच्या वर होणारा अन्याय सिद्ध करण्यासाठी उचललेलं हे पाऊल असल्याचं भटके विमुक्त संघटनेचे समन्वयक अरुण जाधव सांगत आहेत.

या कुटुंबा प्रमाणेच समाजात अशी अनेक कुटुंब आहेत. जी केवळ समाजातील विकृत व्यक्तींमुळे यात अडकून पडली आहे. त्यामुळेच समाजाने देखील आपला दृष्टिकोन बदलून या घटकाला स्वीकारणं गरजेचं आहे.

Updated : 13 May 2022 7:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top