Home > News > HDFC बँकेचा मोठा निर्णय ; HDFC चे HDFC बँकेत विलीनीकरण

HDFC बँकेचा मोठा निर्णय ; HDFC चे HDFC बँकेत विलीनीकरण

HDFC बँकेचा मोठा निर्णय ; HDFC चे HDFC बँकेत विलीनीकरण
X

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (HDFC) आणि HDFC बँक यांनी विलीनीकरणाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता HDFC बँकेत 41% स्टेक असेल. HDFC ने आज सोमवारी जाहीर केलं आहे की, हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन चे HDFC बँकेत विलीनीकरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या विलीनीकरणात कंपनीचे भागधारक आणि कर्जदार यांचाही सहभाग असेल.

एचडीएफसीने सांगितले आहे की, विलीगिकरण कराराचा उद्देश एचडीएफसी बँकेच्या गृह कर्ज पोर्टफोलिओमध्ये सुधारणा करणे आणि विद्यमान ग्राहकांचा विस्तार करणे आहे. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे हे विलीनीकरण आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीपर्यंत पूर्ण होईल.

एचडीएफसी लिमिटेडचे ​​चेअरमन दीपक पारेख म्हणाले की, हे समानांचे विलीनीकरण आहे. RERA च्या अंमलबजावणीमुळे गृहनिर्माण क्षेत्राला पायाभूत सुविधांचा दर्जा, परवडणाऱ्या घरांसाठी सरकारी पुढाकार, यासह इतर गोष्टींमुळे गृहनिर्माण वित्त व्यवसायाला मोठी चालना मिळेल.

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (HDFC) ची मालमत्ता 6.23 लाख कोटी आणि HDFC बँकेची 19.38 लाख कोटी आहे. 31 डिसेंबर 2021 पर्यंत HDFC ची एकूण मालमत्ता 6.23 लाख कोटी रुपये आणि उलाढाल 35,681.74 रुपये आहे. दुसरीकडे, HDFC बँकेची एकूण मालमत्ता 19.38 लाख कोटी रुपये आहे.

दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे

विलीनीकरणाची बातमी येताच दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. सकाळी 10 वाजता बीएसईवर HDFC स्टॉक 13.60% वर होता. त्याचप्रमाणे एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्येही सुमारे 10% वाढ झाली.

---------------------------------

हे ही वाचा..

शिक्षकी पेशाला काळीमा! कोल्हापूरात शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

#Healthtips ; किसिंग ठरू शकतं धोकादायक; कसं ते नक्की वाचा

चुंबनातून पसरणाऱ्या या आजाराला 'किसिंग डिसीज' म्हणतात. 'किसिंग रोग अनेक विषाणूंद्वारे पसरू शकतो, परंतु 90 टक्के प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे की हा रोग एपस्टाईन बार विषाणू (EBV) द्वारे पसरतो, जो मानवी लाळेमुळे होतो.


Updated : 4 April 2022 7:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top