असे चोरटे पाहिले का तुम्ही कधी ?
Max Woman | 27 Jun 2023 11:42 AM GMT
X
X
चोरटे म्हटलं की डोळ्यासमोर त्यांची वाईट प्रतिमा उभी राहते. मात्र, दिल्लीत जरा एका वेगळ्याच चोरट्याचं दर्शन झालंय. त्याचं झालं असं की, एक तरूण जोडपं रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर फिरत होते. त्याचवेळी दोघा चोरांनी बंदुकीच्या जोरावर या जोडप्याला लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, दांपत्याकडे फक्त २० रूपये चोरट्यांना मिळाले. त्यामुळं भ्रमनिरास झालेल्या जोडप्यानं स्वतःकडील १०० रूपये काढून त्या जोडप्याला दिले आणि तिथून फरार झाले. यावेळी ही संपूर्ण घटना शेजारच्या बिल्डिंगमधील एकानं मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली होती. पोलिसांनी स्कुटीवर आलेल्या चोरट्यांना अटक केलीय.
Updated : 27 Jun 2023 11:42 AM GMT
Tags: thieves delhi viral video video MaxWoman
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire