Home > News > संतापजनक : शौचास गेलेल्या महिलेची छेडछाड, मारहाण करत फोडले डोळे

संतापजनक : शौचास गेलेल्या महिलेची छेडछाड, मारहाण करत फोडले डोळे

संतापजनक : शौचास गेलेल्या महिलेची छेडछाड, मारहाण करत फोडले डोळे
X

शिरुर तालुक्यातील न्हावरे गावात संतापजनक घटना घडली आहे. रात्री नऊ वाजेच्या सुमारास शौचास गेलेल्या एका महिलेवर हल्ला करुन तिचे डोळे काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. पीडित महिलेला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेप्रकरणी आरोपी विरोधात शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार न्हावरे परिसरातील बिडगर -सुर्यवंशीवस्ती येथे पीडित शेतमजूर महिला काल रात्री साडेनऊच्या सुमारास आपल्या झोपडीपासून काही अंतरावर लघवी करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्या ठिकाणी एक पुरुष व्यक्ती येऊन त्यांच्याकडे पाहू लागला. त्यावर मुक्ता चित्रे त्याला म्हणाल्या, तुला काय बाईमाणूस दिसत नाही का? त्यानंतर त्या अज्ञात गुन्हेगाराने मुक्ता चित्रे यांच्यावर हल्ला करून त्यांचा एक डोळा काढला. तर दुसऱ्या डोळ्याला गंभीर स्वरूपाची दुखापत केली. या महिलेवर करण्यात आलेल्या हल्ल्याचे स्वरूप इतके गंभीर होते की या महिलेचा एक डोळा जमिनीवर पडलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला.

दरम्यान, शिरुर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपीविरोधात विनयभंग आणि प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. महिलेवर हा जीवघेणा हल्ला कोणी आणि कशासाठी केला याचा तपास शिरुर पोलीस करत आहेत.

Updated : 5 Nov 2020 8:51 AM GMT
Next Story
Share it
Top