Home > News > Teesta Setalvad ; गुजरात दंगलीप्रकरणी तीस्ता सेटलवाड यांना गुजरात ATS घेतले ताब्यात..

Teesta Setalvad ; गुजरात दंगलीप्रकरणी तीस्ता सेटलवाड यांना गुजरात ATS घेतले ताब्यात..

Teesta Setalvad ; गुजरात दंगलीप्रकरणी तीस्ता सेटलवाड यांना गुजरात ATS घेतले ताब्यात..
X

२००२ च्या गुजरात दंगलीप्रकरणी गुजरात एटीएसने सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड आणि माजी डीजीपी आर.बी. श्रीकुमार यांना ताब्यात घेतले आहे. सेटलवाड यांना त्यांच्या मुंबईतील घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना सांताक्रूझ पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. यानंतर गुजरात एटीएस त्यांना अहमदाबादला घेऊन जाण्याच्या तयारीत असल्याचं म्हंटल जात आहे.

गुजरात दंगलीप्रकरणी अहमदाबाद क्राइम ब्रँचने तिस्ता सेटलवाड, माजी आयपीएस संजीव भट्ट आणि गुजरातचे माजी डीजीपी आरबी श्रीकुमार यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी कट रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी संजीव भट्ट आधीच तुरुंगात आहेत, तर तीस्ता आणि श्रीकुमार यांना आता ताब्यात घेण्यात आले आहे. आता असं म्हंटल जात आहे की, फसवणूक प्रकरणी तिस्ताविरोधात आज एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे.

तीस्ताच्या भूमिकेची चौकशी झाली पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते

२००२ च्या गुजरात दंगलीत तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देणाऱ्या एसआयटीच्या अहवालाविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. झाकिया जाफरी यांनी ही याचिका दाखल केली होती. या खटल्यातील सहकारी याचिकाकर्ते सेटलवाड यांनी झाकिया जाफरी यांच्या भावनांशी खेळल्याचे निकालात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, न्यायालयाने तीस्ताच्या भूमिकेची चौकशी करण्यास सांगितले होते.

गृहमंत्री अमित शहा यांनी आज सकाळीच सेटलवाड यांना खडसावले होते

गुजरात दंगलीबाबत निराधार माहिती दिल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सकाळी ANI ला दिलेल्या मुलाखतीती तीस्ता सेटलवाड यांच्या एनजीओला फटकारले होते. याच बरोबर एनजीओला मदत केल्याबद्दल शहा यांनी यूपीए सरकारवरही हल्लाबोल केला होता.

या मुलाखती दरम्यान गुजरात दंगल रोखण्यात पोलिस आणि अधिकाऱ्यांच्या कथित अक्षमतेबद्दल विचारले असता गृहमंत्री म्हणाले की, भाजपविरोधी राजकीय पक्ष, काही विचारधारेसाठी राजकारणात आलेले पत्रकार आणि एका एनजीओने मिळून आरोपांचा प्रचार केला. त्यांची परिसंस्था इतकी मजबूत होती की लोक ते सत्य मानू लागले.

दंगलीच्या तपासात स्वयंसेवी संस्थांच्या भूमिकेवर बोलताना गृहमंत्री म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की झाकिया जाफरी कोणाच्या तरी निर्देशानुसार काम करत आहे. या एनजीओने अनेक पीडितांच्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी केली असून त्यांना माहितीही नाही. तीस्ता सेटलवाड यांची एनजीओ हे सर्व करत होती हे सर्वांनाच माहीत आहे. त्यावेळच्या यूपीए सरकारने एनजीओला खूप मदत केली असल्याचं सुद्धा ते म्हणाले.

Updated : 25 Jun 2022 1:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top