Home > News > क्रांतिकारी कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांना गुगलची 'डूडल'द्वारे मानवंदना...

क्रांतिकारी कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांना गुगलची 'डूडल'द्वारे मानवंदना...

सुभद्रा कुमारी चौहान यांनी स्वातंत्र्य संग्रामात अनेकदा तुरुंगवासही सहन केला.

क्रांतिकारी कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांना गुगलची डूडलद्वारे मानवंदना...
X

Subhadra Kumari Chauhan (सुभद्रा कुमारी चौहान) Google Doodle: गुगलने आज साहित्यिक आणि स्वातंत्र्य सेनानी सुभद्रा कुमारी चौहान यांच्या कार्याचा आणि जीवनाचा सन्मान करण्यासाठी डूडल तयार केले आहे. पुरुषी वर्चस्वाच्या काळात साहित्य क्षेत्रात ज्यांना राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले त्या म्हणजे सुभद्रा कुमारी चौहान, त्यामुळे चौहान यांच्या 117 व्या जयंतीनिमित्त सुभद्रा कुमारी चौहान, पेन आणि कागदासह साडीमध्ये बसलेल्या असल्याचं डूडल गुगलने आज तयार केले आहे. न्यूझीलंडच्या गेस्ट आर्टिस्ट प्रभा मल्ल्या यांनी हे डूडल तयार केले आहे.

सुभद्रा कुमारी चौहान यांचा जन्म 16 ऑगस्ट 1904 रोजी झाला होता. त्या सुप्रसिद्ध हिंदी कवयित्री आणि लेखिका होत्या. त्यांचे दोन कवितासंग्रह आणि तीन कथासंग्रह प्रकाशित झाले. पण त्यातील 'खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी' सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या कवितांपैकी एक मानली जाते. विशेष म्हणजे त्यांची पहिली कविता वयाच्या 9 वर्षी प्रकाशित झाली होती. सुभद्रा कुमारी चौहान यांनी स्वातंत्र्य संग्रामात अनेकदा तुरुंगवासही सहन केला.

Updated : 16 Aug 2021 3:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top